Homeहेल्थ इज वेल्थहृदय प्रत्यारोपण करणारे...

हृदय प्रत्यारोपण करणारे केईएम देशातले पहिले पालिका रूग्णालय

हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या एका रुग्णाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने नुकतेच जीवनदान दिले आहे. या रुग्णावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयात प्रथमच अशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हृदय प्रत्यारोपणासारखी अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया सुरू करणारे केईएम हे भारतातील एकमेव महापालिका रुग्णालय ठरले आहे.

केईएम रुग्णालयामध्ये सन १९६३-६४मध्ये पहिल्यांदा हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हा ती यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे त्यानंतरची अनेक दशके प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या गेल्या नाहीत. ही बाब अतिरिक्त पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर हा विषय प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. केवळ संसाधनांच्या उपलब्धतेने यात यश येणे शक्य नव्हते तर उपलब्ध वैद्यकीय मनुष्यबळालाही यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे होते. त्यामुळे, डॉ. शिंदे यांनी सर्वप्रथम पालिकेच्या संपूर्ण आरोग्य प्रशासनाला विश्वासात घेऊन त्यांना या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले. त्यासाठी वारंवार विचारमंथन केले. विशेषतः केईएम रुग्णालयातील वैद्यकीय चमूला विश्वासात घेऊन अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले.

यानंतर आरोग्य यंत्रणेचा आत्मविश्वास दुणावला आणि केईएममध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपक्रम सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी यासाठी प्रशासनाला तात्पुरता परवाना (प्रोव्हिजनल लायसन्स) मिळाले. त्यानंतर हृदय शस्त्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणे आणि सामग्री खरेदी करण्यात आली. २०पेक्षा जास्त अत्यंत उच्च दर्जाची वैद्यकीय उपकरणे घेऊन तसेच अत्यंत अनुभवी आणि समर्पक वैद्यकीय चमूंच्या साहाय्याने सुसज्ज विभाग कार्यान्वित करण्यात झाला आहे. हृदय प्रत्यारोपण उपक्रम सुरू करण्यासाठी तज्ज्ञ आणि अनुभव वैद्यकीय चमूची आवश्यकता होती. यासाठी हृदय विकारासंबंधीत तज्ज्ञ तसेच अत्यंत अनुभवी असलेले डॉ. प्रवीण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.

केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या रुग्णाला बऱ्याच दिवसांपासून हृदयाचा विकार होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता त्याच्या हृ़दयाचे प्रत्यारोपण करणे हाच एकमेव पर्याय होता. सुदैवाने अवयवदाता उपलब्ध झाल्याने संबंधित रुग्णावर हृदय प्रत्यारोपण करण्याचे निश्चित झाले. प्रत्यारोपण प्रक्रियेतील क्लिष्टता लक्षात घेता हृदयदाता आणि रुग्ण दोघांचेही रितसर समुपदेशन करण्यात आले. हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्णाची तब्येत आता स्थिर आहे.

दरम्यान, या रुग्णाला हृदय देणाऱ्या दात्याचे, त्याच्या कुटुंबियाचे तसेच ही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करणारे हृदय शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. उदय जाधव, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी याकरीता विशेष प्रयत्न केले.

हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी खासगी रुग्णालयात साधारणपणे ३५ लाख रूपयांचा खर्च येतो. तथापि बृहन्मुंबई महानगरपालिकेत हा खर्च ८ लाख रुपये इतका असेल. पालिकेच्या पुढाकाराने हाही खर्च महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीद्वारे करण्यासाठी सहाय्य केले जाते.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content