Homeचिट चॅटकुर्ल्यात शालेय मुलांचे...

कुर्ल्यात शालेय मुलांचे कबड्डी शिबिर संपन्न

गोरखनाथ महिला संघ, हनुमान क्रीडा मंडळ यांच्या विद्यमाने ज्ये‌ष्ठ राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच प्रशिक्षक बंडू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या कुर्ला पश्चिम येथील गांधी मैदानात शालेय मुलांसाठी पाच दिवसांचे मोफत कबड्डी प्रशिक्षण शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले. 50पेक्षा जास्त शालेय मुलांनी या शिबिरात सहभाग घेतला. सायंकाळच्या सत्रात अडीच तास या मुलांना कबड्डी खेळाचे धडे देण्यात आले. या प्रशिक्षणवर्गात कबड्डी सराव कसा करावा, कबड्डी खेळाचे कौशल्य कसे वाढवावे, ते वाढवण्यासाठी कोणते व्यायामप्रकार करावेत याचे मार्गदर्शन रोहित मोरे, वेदांत महाडिक, ओंकार वेताळ यांनी केले.

निवेदक प्रतीक गाढवे यांनी मुलांना या खेळातील विविध कौशल्य प्रात्यक्षिकांसह दाखवून दिली. कबड्डीतील नियमांची माहिती गौरी महाडिक, प्रतीक्षा गाडगे या मुंबई उपनगरच्या पंचांनी करून दिली. या शिबिरात राष्ट्रीय खेळाडू सचिन आयरे, एअर इंडियाचे खेळाडू नितीन घाग, बी.पी.सी.ए.चे सदस्य दीपक कांदळगावकर, सन्मित्र क्रीडा मंडळाचा राष्ट्रीय खेळाडू सोहम पुंदे, राष्ट्रीय पंच महादेव घाणेकर यांनी भेट देऊन खेळाडूंना मार्गदर्शन केले. सदर शिबिर आयोजन करण्यासाठी गौरीशंकर क्रीडा मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व शिबिरार्थींना पदके दिली. त्यांच्या शाळांनादेखील गौरवचिन्ह भेट देण्यात आली. दररोज खेळाडूंना खाऊचे वाटप करण्यात आले. यंदा प्रथमच शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भावी काळात असेच नियमित शिबिराचे व त्याबरोबरच या मुलांसाठी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये स्पर्धा घेण्याचा आयोजकांचा मानस आहे, असे क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक यांनी सांगितले.

Continue reading

ऊर्जा प्रकल्पांच्या संरक्षणासाठी इराणमध्ये ‘मानवी साखळी’!

पश्चिम आशियातील युद्ध आता एका निर्णायक आणि भयानक वळणावर येऊन ठेपले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कठोर इशाऱ्यानंतर, इराणने आपल्या देशातील वीजनिर्मिती केंद्र आणि पायाभूत सुविधा वाचवण्यासाठी अनोखी शस्त्रास्त्रे वापरण्याऐवजी 'मानवी ढाल' (ह्यूमन शिल्ड) तयार करण्याचा...

खुर्चीची मस्ती डोक्यात जाऊ देऊ नका!

आपल्या रोकठोक आणि निर्भीड स्वभावासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. "सत्ता आज आहे, उद्या नसेल; पण खुर्चीची मस्ती कधीही डोक्यात जाऊ देऊ नका," अशा शब्दांत गडकरींनी नेत्यांना खडेबोल...

‘छोटू गॅस’ सिलिंडरच्या कोट्यात दुप्पट वाढ

देशातील विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या स्थलांतरित मजुरांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ५ किलो वजनाच्या 'फ्री ट्रेड एलपीजी' (एफटीएल) सिलिंडरच्या दैनंदिन वाटप कोट्यात सरकारने आता दुप्पट वाढ केली आहे. "छोटू गॅस" म्हणून या सिलिंडरची कष्टकरी...
Skip to content