Homeकल्चर +के. सीता राममोहन...

के. सीता राममोहन राव, जयश्री पाटणेकर, ईशा डे होणार सन्मानित

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर झाले असून हे पारितोषिक वितरण येत्या रविवारी, १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. के. सीता राममोहन राव यांना संगीत शिक्षक जीवनगौरव पुरस्कार, जयश्री पाटणेकर यांना संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत, कुमार सोहोनी यांना उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक, अजित भुरे यांना ज्येष्ठ रंगकर्मी तर ईशा डे यांना उत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या मान्यवरांना रविवारी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

याशिवाय डॉ. नीती बडवे यांच्या मुशाफिरी, या पुस्तकासाठी उत्कृष्ट प्रवासवर्णनाचा तर तन्वी गोरे यांना संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्रीचा पुरस्कार दिला जाणार आहे. संगीत विशारद परीक्षेत मुंबई विभागातून प्रथम आलेल्या सौम्या क्षीरसागर आणि रोहन देशमुख यांनाही ताराबाई दीक्षित पुरस्काराने सन्मानित केले जाईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- २४३०४१५०, ७७००९९४४९५.

Continue reading

आशाताईंना देशभरातून भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी पसरताच देशभरातून शोकसंदेशांचा गहिवर लोटला. राष्ट्रपती भवनापासून ते सामान्य चाहत्यांपर्यंत, आणि मुंबईच्या गल्लीबोळांपासून ते आखाती देशांतील रेस्तराँपर्यंत, सर्वांनीच या महान स्वराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशाताई रुग्णालयात दाखल...

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...
Skip to content