Friday, November 22, 2024
Homeकल्चर +'जेएल स्ट्रीम'ने उघडला...

‘जेएल स्ट्रीम’ने उघडला मनोरंजनाचा खजिना!

लॉकडाऊन आणि कोव्हिड-१९च्या कटू वास्तविकतेदरम्यान, अनेक लोकांना जागरूक ठेवणारी आणि मनोरंजन करणारी एकमेव गोष्ट म्हणजे सोशल मीडिया आणि क्रिएटिव्ह ऑनलाईन कंटेंट. याच पार्श्वभूमीवर, जेएल स्ट्रीम अॅप हे नव्या काळातील कंटेंट क्रिएटर्समध्ये एक आकर्षण बनले आहे.

जेएल (जल्दी लाइव्ह) स्ट्रीम हे जानेवारी २०२१मध्ये सुरू झालेले स्टार्ट अप आता विविध पसंती असलेल्या लोकांच्या मोठ्या गटाला सेवा देत वन-स्टॉप एंटरटेनमेंट डेस्टिनेशन बनले आहे. ५०० हजारपेक्षा जास्त डाऊनलोड्ससह, यात कविता कौशिक, पलक मुचल, जसबीर जस्सी, दल्लजित कौर, पूजा मिश्रा, अली कुली मिर्झा आणि सोफी चौधरी यांच्यासारख्या अनेक इन्फ्लूएंसर आणि प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. खरं तर, मासिक महसूलात १००,००० यूएसडी वाढ होत असली तरीही अॅपने लाईव्ह स्ट्रीमिंग क्षेत्रात आधीच बेंचमार्क प्रस्थापित केला आहे.

जेएल स्ट्रीम

एकमेव आणि वैशिष्ट्यपूर्ण सुविधांसह, हे अॅप यूझर्सना तत्काळ लाईव्ह जाण्यास मदत करते. तसेच जगभरातील समविचारी लोकांना भेटण्याची आणि चॅट करण्याची संधी देते. यात चॅट आणि मॅच फिचर असून याद्वारे जगातील समविचारी आणि समान कल्पना असेलल्या लोकांशी याद्वारे कनेक्ट करता येते. या अॅपमध्ये अनेक प्रकारच्या गंमतीसह मोठे मनोरंजन आहे. तसेच काही महत्त्वपूर्ण सुविधाही यात अपडेट केल्या जाणार आहेत.

२०२२ या वर्षापर्यंत भारतीय डिजिटल मीडिया २२.४७%च्या सीएजीआरसह २३,६७३ रुपयांपर्यंत पोहोचेल, असे डेंत्सुच्या हवाल्यासह, माध्यमांत सांगण्यात आले आहे. तसेच २०२५पर्यंत भारतीय लोकसंख्येपैकी ६७% लोक सोशल नेटनवर्क सर्व्हिस प्लॅटफॉर्म वापरतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावरून असे दिसते की, भारतातील ऑनलाईन कंटेंट मार्केट वाढत जाईल आणि जेएल स्ट्रीमसारखे अॅप मनोरंजन क्षेत्रात नवी शिखरे गाठत तरुण पिढीला मदत करत राहतील.

Continue reading

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...
Skip to content