Monday, December 23, 2024
Homeटॉप स्टोरीमुंबईत बनावट हॉलमार्कचे...

मुंबईत बनावट हॉलमार्कचे ३ कोटींचे दागिने जप्त!

भारतीय मानक ब्युरो (बीआयएस)च्या अधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबईतल्या अंधेरी भागातल्या एका कंपनीवर धाड टाकून हॉलमार्कचे बनावट शिक्के मारलेले जवळजवळ ७१४ ग्रॅमचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या दागिन्यांची किंमत सुमारे तीन कोटी ३५ लाख रूपये आहे.

अंधेरी पूर्वेच्या मिस्त्री इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्सच्या २४ नंबर युनिटमधल्या मेसर्स क्लासिक कॅरेट अॅसे लॅब प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीत सोन्यांच्या दागिन्यांवर हॉलमार्कचे बोगस स्टँप (शिक्के) मारले जात असल्याची माहिती बीआयएसच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे या अधिकाऱ्यांनी तेथे झापा मारला. तेव्हा त्यांना बीआयएसची मान्यता नसलेल्या काही दुकानांमधून आणलेल्या दागिन्यांवर बनावट स्टँप मारल्याचे आढळून आले. असे सुमारे तीन कोटी ३५ लाख रूपये किंमतीचे ७१४ ग्रॅम वजनांचे दागिने या अधिकाऱ्यांनी जप्त केले.

हे दागिने एमोर ज्वेल्स, अबांस ज्वेल्स, ओम शिल्पी ज्वेल्स अँड जेम्स, सत्कार ज्वेलर्स (परळ), कलश गोल्ड अँड ऑरनामेंट्स, कलश ज्वेल् (अंधेरी पूर्व), युनी डिझाईन ज्वेलरी, या दुकानांतील हे दागिने असून या दुकानांना भारतीय मानक ब्युरोची मान्यता प्राप्त नाही.

सोन्याचे दागिने आणि इतर कलाकुसरीच्या वस्तूंच्या हॉलमार्किंगबद्दल ग्राहक व्यवहार विभागाने 2020मध्ये जारी केलेल्या आदेशानुसार, 16 जून 2021पासून सोन्याचे दागिने आणि इतर सर्व वस्तूंवर बीआयएस हॉलमार्क असणे अनिवार्य करण्यात आले आहे. सध्या असलेल्या बीआयएस हॉलमार्कमध्ये तीन घटक समाविष्ट आहेत- बीआयएसचा  लोगो, सोन्याच्या शुद्धतेची कॅरेटमध्ये माहिती आणि सहा अंकी अल्फा-न्यूमारिक “हॉलमार्किंग युनिक आयडेंटीटी (HUID) क्रमांक”. हा क्रमांक प्रत्येक वस्तूवर/दागिन्यावरचा वेगळा असतो. दागिने केवळ बीआयएस अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या व्यापारी/दुकानदारांनाच विकता येतील. तसेच सर्व दागिने बीआयएस मान्यताप्राप्त मूल्यांकन आणि हॉलमार्किंग केंद्रांवरूनच हॉलमार्किंग केलेले असावेत.

हॉलमार्कसह बीआयएस प्रमाणित चिन्हाचा गैरवापर करणे गुन्हा असून त्यासाठी, दोन वर्षांची शिक्षा आणि किमान 2,00,000 रूपयांपर्यंत दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या अप्रमाणित वस्तूंच्या किंमती लक्षात घेता, दंडाची रक्कम वाढूही शकते. सोमवारी झालेल्या जप्तीप्रकरणी प्राथमिक अहवाल दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अनेकदा ग्राहकांना बनावट हॉलमार्किंग ज्वेलरी विकून सराफ दुकानदार मोठ्या प्रमाणात नफा कमावत असल्याचे बीआयएसच्या तपासात आढळले आहे. म्हणूनच सोमवारी झालेल्या या  कारवाईनंतर, सर्व नागरिकांनी सोने खरेदी करताना बीआयएसचा संपूर्ण हॉलमार्क असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन भारतीय मानक ब्युरोने केले आहे.

प्रमाणित, नोंदणीकृत ज्वेलर्सची नावे, ‘बीआयएस केअर’ या मोबाईल अॅपवर बघता येईल. तसेच बीआयएसचे संकेतस्थळ, http://www.bis.gov.in  यावरदेखील ही यादी उपलब्ध आहे.

जर ग्राहकांना बनावट बीआयएस हॉलमार्क आढळला किंवा हॉलमार्कची मान्यता नसलेल्या दुकानदारांकडून हॉलमार्कचा गैरवापर होत असल्याचे आढळले तर त्याची तक्रार किंवा माहिती उपसंचालक, पश्चिम क्षेत्र कार्यालय, बीआयएस, मानकलया, ई-9, मरोळ टेलिफोन एक्सचेंजच्या मागे, अंधेरी पूर्व, मुंबई-400 093 येथे द्यावी. अशा तक्रारी ddgw@bis.gov.in या ईमेल आयडीवरही पाठवता येतील. अशा माहितीचा स्त्रोत गुप्त राखला जाईल, असे बीआयएसकडून सांगण्यात आले.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content