प्रिय वाचक,
किरण हेगडे लाईव्ह, आपल्यासमोर लवकरच नव्या स्वरूपात सादर होत आहे. याची अपग्रेडेशनची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केएचएल, अनियमितरित्या सुरू आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण लवकरच नव्या स्वरूपातील 'किरण हेगडे लाईव्ह'ला प्रतिसाद द्याल, अशी आशा बाळगतो.

धन्यवाद.

किरण हेगडे, संपादक

प्रिय वाचक,

किरण हेगडे लाईव्ह, आपल्यासमोर लवकरच नव्या स्वरूपात सादर होत आहे. याची अपग्रेडेशनची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केएचएल, अनियमितरित्या सुरू आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण लवकरच नव्या स्वरूपातील 'किरण हेगडे लाईव्ह'ला प्रतिसाद द्याल, अशी आशा बाळगतो. धन्यवाद. किरण हेगडे, संपादक

Homeपब्लिक फिगरनाना पटोलेंच्या मते...

नाना पटोलेंच्या मते शरद पवार आजही ‘दगाबाज’?

राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत. पण, २०१४ सालचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेवटच्या क्षणी झालेला धोका आम्ही विसरू शकत नाही. त्यामुळे आम्ही आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी आतापासूनच करत आहोत आणि ही तयारी चालूच राहणार, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुन्हा राष्ट्रवादीला आपले लक्ष्य केले.

लहान माणसांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया देत नाही, असे सांगत नाना पटोले यांना उडवून लावणाऱ्या शरद पवार यांनी काल काँग्रेसच्या नेत्यांकडे नाराजी व्यक्त करूनदेखील आज पुन्हा २०१४चा मुद्दा उकरून काढत नाना पटोले यांनी पवार यांची प्रतीमा आजही  ‘दगाबाज’ अशीच आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असा सूर काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे.

नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावरून महाविकास आघाडीत नाराजी वाढली असतानाच नाना पटोले यांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महाविकास आघाडीतली धुसफूस शमवण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यावेळी उपस्थित होते. परंतु पटोले त्यांच्याबरोबर चर्चेला गेले नाहीत. आज मात्र, पटोले यांनी या बैठकीसाठी आपल्याला निमंत्रणच नसल्याचे सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या या दोन पक्षांमधील समन्वय किती ढिसाळ आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

पटोले

या बैठकीत पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या पद्धतीने समज दिल्याचे कळते. काँग्रेस पुढच्या निवडणुका स्वबळावर लढणार असेल तर त्यांनी आताच ते स्पष्ट करायला हवे. पक्षाचा निर्णय तसा झाला आहे का, पटोले यांना तसे अधिकार दिले आहेत का, आपला पक्ष वाढविण्याचे अधिकार प्रत्येकाला आहे. परंतु सत्तेत असताना सहकारी पक्षांवर टीका करून वातावरण दूषित करता कामा नये, असे पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सुनावले, असे कळते.

पवार यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेस नमते घेईल असे वाटत असतानाच आज पुन्हा पटोले यांनी स्वबळाची भाषा केली. २०२४ साली महाराष्ट्रात काँग्रेस हाच नंबर एकचा पक्ष असेल, हा आमचा अजेंडा आहे. आणि २०१४मध्ये राष्ट्रवादीने दिलेला धोका लक्षात घेता आयत्या वेळी पुन्हा त्यांनी तशी भूमिका घेतली तर आम्ही काय करायचे? त्यामुळे आम्ही आतापासूनच स्वबळाची तयारी करत आहोत, असे स्पष्ट केले. मात्र, हे करताना त्यांनी राष्ट्रवादीने २०१४ साली दिलेल्या धोक्याचा उल्लेख केल्याने पवार संतप्त झाल्याचे बोलले जाते. याचे पडसाद महाविकास आघाडीत उमटतील, अशीही चर्चा आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसला नवसंजीवनीची गरज असल्याचे म्हटले आहे. राऊत यांच्या या वक्तव्याचाही परामर्ष घेताना पटोले यांनी, काँग्रेस मरणासन्न अवस्थेत अजिबातच नाही. संजीवनी नेत्यांकडे नाही जनतेकडे असते असे सुनावले आहे.

Continue reading

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...

महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसाठी नोंदवा 31 ऑगस्टपर्यंत सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 3 नोव्हेंबर, 2025पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांंसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांंसाठी नाट्यसंस्थांकडून येत्या 31 ऑगस्ट, 2025पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती...
Skip to content