Sunday, March 16, 2025
Homeएनसर्कलभारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान...

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आजपासून!

जैवतंत्रज्ञान विभाग (डी. बी. टी.) संस्थेचे प्रादेशिक जैवतंत्रज्ञान केंद्र फरीदाबाद (हरियाणा) येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट येथे आजपासून भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव सुरू होत आहे. हा भव्य विज्ञान मेळा आज, 17 जानेवारीला सुरू होईल तर 20 जानेवारीला त्याची सांगता होईल. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, राष्ट्रीय नवोन्मेष फाउंडेशन ह्या स्वायत्त संस्थेच्या सहकार्याने, या नवव्या विज्ञान महोत्सवाचे आयोजन आणि अंमलबजावणी करणार आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयात, भारताच्या कामगिरीचा, यशाचा उत्सव साजरा करणे हा या विज्ञान महोत्सवाचा उद्देश आहे. त्याशिवाय, विज्ञानप्रेमींच्या कामगिरीची दखल घेणे आणि युवा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण करणे आणि भारतीय नागरिकांमध्ये त्याचा प्रसार करणे हा देखील महोत्सवाचा उद्देश आहे. राष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 ची मध्यवर्ती संकल्पना ‘अमृतकाळात विज्ञान आणि तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे’ ही आहे.

विज्ञान

यंदाच्या म्हणजेच, विज्ञान महोत्सवामध्ये 22 देश सहभागी होत आहेत. यात अर्जेंटिना, आर्मेनिया, ऑस्ट्रेलिया, कंबोडिया, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, केनिया, लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक, मलेशिया, म्यानमार, नामिबिया, फिलीपिन्स, रवांडा, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, थायलंड, इंग्लंड, अमेरिका, व्हिएतनाम आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय भारतीय विज्ञान महोत्सवाच्या चारही दिवसांसाठी खालील कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.

यात विद्यार्थी विज्ञान गाव (सायन्स व्हीलेज), विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे नवे प्रयोग आणि शोध प्रत्यक्ष जाणून घेणे, खेळ आणि खेळण्यांच्या माध्यमातून विज्ञान, विद्यार्थी नवोन्मेष महोत्सव-स्पेस हॅकेथॉन, राज्यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि केंद्र आणि राज्यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सचिव आणि अधिकारी यांची परिषद, आकांक्षी भारतासाठी शिक्षण-राष्ट्रीय विज्ञान शिक्षक कार्यशाळा, युवा शास्त्रज्ञ परिषद, नवीन युग तंत्रज्ञान प्रदर्शन, राष्ट्रीय सामाजिक संघटना आणि संस्थांची बैठक, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष प्रदर्शन, स्टार्ट-अप, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष बी टू बी मीट म्हणजे, व्यावसायिकांची परस्पर बैठक यांचा समावेश आहे.

Continue reading

‘शातिर..’मधून अभिनेत्री रेश्मा वायकर करणार पदार्पण

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या महिलाप्रधान चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते. मात्र मराठीत महिलाप्रधान सस्पेन्स थ्रिलर प्रकारातील चित्रपटांचा अभाव आहे. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने ‘शातिर THE BEGINNING’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या...

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...
Skip to content