Homeहेल्थ इज वेल्थउद्यापासून मुंबईत ओरल...

उद्यापासून मुंबईत ओरल मेडिसिनवर आंतरराष्ट्रीय परिषद!

मुंबईत वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रात 28-29 ऑक्टोबर 2023 दरम्यान, मेटॅलियन्स 2023 ही ओरल मेडिसिन म्हणजेच मुखाव्दारे घेण्‍याची औषधे, रेडिओलॉजी म्हणजेच किरणोत्सर्गाचे शास्त्र आणि पर्यावरण तसेच सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील अलीकडच्या काळातील प्रगती या विषयावरील 18वी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जाणार आहे.

या प्रतिष्ठित परिषदेच्या माध्यमातून, ओरल मेडिसिन, रेडिओलॉजी, आणि पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील गंभीर समस्यांच्या उपायांवर विचारमंथन करण्यासाठी जगभरातील आघाडीचे तज्ञ, विद्वान आणि संशोधक एकत्र येतील. 

अमेरिकेच्या मॉर्गन स्टेट विद्यापीठाचे डीन प्रा. डॉ. पॉल त्चौनवू या परिषदेचे उद्घाटन करतील, तसेच मागील मेटॅलियन्स परिषदेच्या कार्यवाहीबाबत सर्वसमावेशक माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन होईल. मुंबई महानगरपालिकेच्या नायर दंतवैद्यकीय रुग्णालयामधील प्रा. डॉ. सुनाली खन्ना, मेटॅलियन्स 2023 चे अध्यक्षपद भूषवतील.

नवी दिल्ली येथील CSIR मुख्यालयाचे प्रा. डॉ. राकेश कुमार, परिषदेच्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील. ही परिषद एक गतिशील आणि माहितीपूर्ण कार्यक्रम असून, या क्षेत्रापुढील सध्याच्या महत्त्वाच्या समस्यांची हाताळणी करण्यासाठी अत्याधुनिक संशोधन, नवोन्मेष आणि व्यावहारिक उपाय शोधण्यावर यावेळी भर दिला जाईल.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहयोगाने नेहरू विज्ञान केंद्राद्वारे मेटॅलियन्स 2023चे आयोजन करण्यात आले असून, ओरल मेडिसिन, रेडिओलॉजी, आणि पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य उपक्रमांना जागतिक स्तरावर पुढे नेण्याच्या अंतिम ध्येयासह, या महत्वाच्या क्षेत्रांमधील सहयोग, ज्ञानाची देवाणघेवाण आणि नवोन्मेशी  विचारांना चालना देणे हे याचे उद्दिष्ट आहे.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content