Homeहेल्थ इज वेल्थसेव्हन हिल्स रुग्णालयात...

सेव्हन हिल्स रुग्णालयात अतिदक्षता विभाग कार्यान्वित!

मुंबईतील महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर स्थितीतील रुग्णांकरीता सेव्हन हिल्स रुग्णालयात डायलिसिस सुविधेसह १०० रुग्णशय्या क्षमतेचा अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील निदान व वैद्यकीय उपचारसुविधांचा लाभ मुंबई महानगरातील नागरिकांसह लगतच्या मीरा-भायंदर, वसई-विरार ते थेट पालघर-डहाणू, ठाणे-कल्याण, अंबरनाथ-बदलापूर या परिसरातील नागरिकांनादेखील होतो. दरवर्षी पावसाळ्यामध्ये पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढत असते. उपनगरीय रुग्णालयांचे प्रशासन पावसाळाजन्य आजारांच्या रुग्णांना दाखल करुन, त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यासाठी सज्ज असतात. रुग्णांवर उपचार करीत असताना आजारांच्या स्थितीची सर्व माहिती संकलन करून, त्याचे विश्लेषण करून आरोग्य कार्यवाहीची दिशादेखील ठरवली जाते.

यंदाच्या वर्षी ताप-अंगदुखीच्या तक्रारींचे रुग्ण गंभीर अवस्थेत उपनगरीय रुग्णालयांमध्ये दाखल होत असल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा रुग्णांच्या उपचारांमध्ये कमतरता राहू नये यासाठी पालिकेने अतिदक्षता रुग्णशय्या अतिरिक्त संख्येने उपलब्ध करण्यासाठी मरोळच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाची निवड केली आहे. कोविड संसर्ग कालावधीत सेव्हन हिल्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात रुग्णशय्या कार्यान्वित होत्या. या पायाभूत सुविधांचा वापर नागरिकांच्या हितासाठी व्हावा, याकरीता पालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांत दाखल झालेल्या गंभीर अवस्थेतील रुग्णांना सेव्हन हिल्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रुग्णांसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात १०० अतिदक्षता रुग्णशय्या राखून ठेवण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या प्रशासनाला दिले आहेत.

मुंबईतील महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांतून पाठविलेल्या रुग्णांना सेव्हन हिल्स रुग्णालयात डायलिसिससह अतिदक्षता विभागाची आणि संभाव्य इतर आजारांवरील उपचारांची सेवा पालिकेच्या दरांनुसार उपलब्ध करण्यात यावी, त्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी यांनी देखरेख करावी, असे निर्देशदेखील डॉ. शिंदे यांनी दिले आहेत.

Continue reading

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...
Skip to content