Homeपब्लिक फिगरभारतीय समस्यांसाठी भारतीय...

भारतीय समस्यांसाठी भारतीय उपाय!

भारतीय समस्यांसाठी भारतीय उपाय आणि भारतीय सृजनशीलतेसाठी भारतीय माहिती संकलन आणि अगदी मानवी वैशिष्ट्येसुद्धा उर्वरित जगापेक्षा निराळी आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी विज्ञान भारतीच्या 6व्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना सांगितले.

पुण्यात एमआयटी- एडीटी विद्यापीठ इथे ते बोलत होते. पारंपरिक ज्ञान ही आमची अनन्यसाधारण संपत्ती आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने दोन्ही जगतातील सर्वोत्तम गोष्टी मिळवण्यासाठी ‘पारंपरिक ज्ञान अंकेक्षित ग्रंथालय’ सुरू केले आहे. प्राचीन औषधांबद्दल पूर्वग्रह असलेल्या लोकांना कोविड काळात त्यांचे मत बदलावे लागले. तथाकथित प्रगत देशांमधील लोक महामारीच्या काळात कोणत्याही आयुर्वेदिक उपचारांसाठी आपल्यापर्यंत पोहोचायचे असे त्यांनी सांगितले.

भारताची वैज्ञानिक क्रांती 2014मध्ये 350 स्टार्टअप्सवरून 2024मध्ये जवळपास 1.5 लाख झाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणकांची पूर्तता करून भारताने स्वत:चे असे मानकही प्रस्थापित केले आहे. जागतिक स्टार्टअपमध्ये भारत आता तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे जगाला अवगत झाले आहे. जागतिक सृजनशीलता निर्देशांकात भारत 2014मधील 81व्या स्थानावरून 40व्या स्थानावर पोहोचला आहे. विज्ञानात सर्वाधिक पीएचडी करणाऱ्यांमध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत, असे त्यांनी सांगितले.

विज्ञानाचे विद्यार्थी असल्याने आम्हाला पुराव्यानिशी बोलायला शिकवले जाते आणि भारतीयत्वावरील आमचा विश्वास हा केवळ राष्ट्रीय अभिमान नसून तो सुयोग्य वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहे. सांस्कृतिक तसेच भांडवली संसाधनांसह पूरक सामूहिक प्रयत्नांनी सार्वजनिक-खासगी क्षेत्रात एकत्रित काम करावे, असे आवाहमही डॉ. सिंह यांनी केले.

डॉ. सतीश रेड्डी, डॉ. विजय भटकर, डॉ. शेखर मांडे, स्वामी श्रीकांतानंद महाराज, प्रा. विश्वनाथ कराड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

Continue reading

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....

येत्या रविवारी आस्वाद घ्या ‘त्रिधा’चा

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या निमित्ताने एक विशेष संगीत कार्यक्रम ‘त्रिधा’ सादर होणार आहे. येत्या रविवारी, १८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे यांची...

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...
Skip to content