Homeचिट चॅटभारतीय नौदल प्रश्नमंजुषेचा...

भारतीय नौदल प्रश्नमंजुषेचा क्षितिजापलीकडील प्रवास!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, भारतीय नौदलाने विविध तळांवर आयोजित केलेल्या आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धांना राष्ट्रीय स्तरावरील शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा – भारतीय नौदल प्रश्नमंजुषा (THINQ) मध्ये रूपांतरित केले होते. या वर्षी भारताने प्रतिष्ठित G20 चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, THINQ हा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम बनला आहे आणि त्याचे “G20 THINQ” असे नामकरण केले गेले आहे. हा कार्यक्रम नौदलाद्वारे G20 सचिवालयाच्या नेतृत्त्वाखाली आणि NWWA (नेव्ही वेलफेअर अँड वेलनेस असोसिएशन) सोबत भागीदारीत आयोजित केला जात आहे आणि त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे दोन स्तर असतील.

G20 THINQ च्या राष्ट्रीय फेरीत इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचे शालेय विद्यार्थी सहभागी होतील. या प्रश्नमंजुषेसाठी 11700 हून अधिक शाळांनी नोंदणी केली आहे.

दोन ऑनलाइन एलिमिनेशन अर्थात बाद फेऱ्या होणार आहेत, पहिली 12 सप्टेंबर 23 रोजी आणि दुसरी 03 ऑक्टोबर 23 रोजी. त्यानंतर 10 ऑक्टोबर 23 रोजी ऑनलाइन उपांत्यपूर्व फेरी होईल, ज्यामधून 16 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील ( प्रत्येक झोनमधून चार शाळा). उपांत्य फेरीचे स्पर्धक 17 नोव्हेंबर 23 रोजी एनसीपीए सभागृहात होणाऱ्या राष्ट्रीय उपांत्य फेरीसाठी मुंबई येथे एकत्र येतील. त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया येथे 18 नोव्हेंबर 23 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अंतिम फेरीत अव्वल 08 संघात मुकाबला होईल. राष्ट्रीय फेरी पूर्ण झाल्यावर, सर्व अंतिम स्पर्धकांमधून दोन सर्वोत्तम स्पर्धकांची आंतरराष्ट्रीय फेरीत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड केली जाईल.

G20 THINQ च्या आंतरराष्ट्रीय फेरीत जगभरातील तरुण आणि कुशाग्र अशा G20 भागीदारांमधील स्नेहबंध मजबूत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व दिसेल. या फेरीत G20 आणि आणखी 9 देशांतील संघांचा सहभाग असेल, प्रत्येक संघात दोन विद्यार्थ्यांचा समावेश असेल. 16 राष्ट्रीय उपांत्य फेरीतील आणि आंतरराष्ट्रीय सहभागींसह सर्व प्रतिनिधींना त्यांच्या भेटीदरम्यान भारताचा वैविध्यपूर्ण वारसा आणि संस्कृती अनुभवण्याची संधी मिळेल आणि त्यांना देशातील विविध लोकप्रिय स्थळे आणि स्थानांची भेट घडवली जाईल. 22 नोव्हेंबर 23 रोजी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

शाळांसाठी नोंदणी प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी आणि सर्व कार्यक्रम-संबंधित माहिती प्रदान करण्याकरिता, G20 THINQ साठी एक समर्पित संकेतस्थळ (www.theindiannavyquiz.in) सुरू करण्यात आले आहे.

01 डिसेंबर 23 रोजी भारताने ब्राझीलला G20 अधिकार सुपूर्द केल्यावर, G20 THINQ हा 22 डिसेंबरपासून आयोजित महत्त्वपूर्ण कार्यक्रमांच्या मालिकेचा शेवटचा अध्याय असेल. हा भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील एक उल्लेखनीय समारोप समारंभ असेल जो जागतिक स्तरावर G20 च्या अद्वितीय कामगिरींची दखल ठरेल.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content