Homeपब्लिक फिगरभारत होतोय संरक्षण...

भारत होतोय संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर…

भारताला धोरणात्मक अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सरकार देशांतर्गत संरक्षण औद्योगिक परिसंस्थेचा मजबूत पाया विकसित करत आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तेजपूर येथे 31 डिसेंबर 2023 रोजी तेजपूर विद्यापीठाच्या 21व्या दीक्षांत समारंभाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह संबोधित करत होते. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मंत्रालय सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने केलेल्या विविध उपायांचा उल्लेख करून राजनाथ सिंह यांनी पहिल्यांदाच शस्त्रांच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आल्याचे सांगितले.  आम्ही पाच सकारात्मक स्वदेशीकरण याद्या जारी केल्या, ज्या अंतर्गत 509 संरक्षण उपकरणे निश्चित केली गेली असून आता त्याचे उत्पादन स्वदेशी पद्धतीने केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त, सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण विषयक उपक्रमांच्या 4 सकारात्मक स्वदेशीकरण याद्या देखील जारी केल्या आहेत. या याद्यांमध्ये 4,666 वस्तू निश्चित करण्यात आल्या असून आता त्या आपल्या देशातच तयार केल्या जातील, असे संरक्षणमंत्री म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सध्याच्या सरकारचा सक्रिय  दृष्टिकोन विशद केला. या सक्रिय दृष्टिकोनामुळे विश्वासार्हतेबाबतच्या शंकाकुशंकांची जागा विश्वासाच्या संस्कृतीने घेतली आहे, असे ते म्हणाले. “असेच राहू द्या” हा दृष्टिकोन भारत आता सहन करणार नाही. आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली, नवा भारत “चला-करूया” या दृष्टिकोनावर विश्वास ठेवतो, असे राजनाथ सिंह म्हणाले.

Continue reading

नाशिकमध्ये झाला ग्लॅमर आणि सांस्कृतिक वारशाचा मिलाफ!

महाराष्ट्राच्या सुवर्ण परंपरेचा वारसा जपणाऱ्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स (पीएनजीजेएल)ने आपल्या विस्ताराचा अश्वमेध सुरूच ठेवला असून, मुंबईसह आता नाशिकमध्ये आपले नवीन भव्य दालन सुरू केले आहे. नाशिकच्या वाढत्या बाजारपेठेची गरज आणि ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन कंपनीने हे पाऊल...

तीन-चार महिन्यांनंतर वाढणार साखरेची ‘गोडी’!

जागतिक बाजारात सध्या साखरेच्या दराबाबत मोठी खळबळ उडाली आहे. 2026च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) साखरेचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याला केवळ मागणी कारणीभूत नसून, त्यामागे पॅसिफिक महासागरातील हवामान बदल, ऊर्जेची भूक आणि...

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...
Skip to content