Homeब्लॅक अँड व्हाईटडिजिटल क्षेत्रातल्या सहकार्यासाठी...

डिजिटल क्षेत्रातल्या सहकार्यासाठी भारत आणि क्युबात सामंजस्य करार!

डिजिटल परिवर्तनासाठी, व्यापक स्तरावर डिजिटल उपाययोजना सामाईक करण्याच्या क्षेत्रात, सहकार्य करण्याबाबत, भारत आणि क्युबा यांच्यातील सामंजस्य कराराला नवी दिल्लीत नुकतीच मंजुरी देण्यात आली.

भारताच्या बाजूने माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव एस. कृष्णन आणि क्युबाच्या बाजूने दूरसंचार विभागाचे उपमंत्री विल्फ्रेडो गोन्झालेझ विडाल यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. दोन्ही देशांच्या डिजिटल व्यवस्थांना परस्पर लाभ मिळवून देण्यासाठी क्षमता बांधणी कार्यक्रम, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण आणि इतर सहयोगी उपक्रमांद्वारे डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन देणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

क्युबामध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा सहजपणे अंगीकार केला जावा, यासाठी, डिजिटल परिवर्तनाबाबत, विकास भागीदारी निर्माण करून, भारत क्युबाला सहकार्य करेल.

Continue reading

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...
Skip to content