Homeपब्लिक फिगर2039मध्ये भारताची अर्थव्यवस्था...

2039मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर

भारताची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत आता 5व्या क्रमांकावर असून 2039मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर येऊन भारत जगात जागतिक महासत्ता होईल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकताच व्यक्त केला.

दुबईमधील बुर दुबईतील एम स्क्वेअर येथील हिल्टन डबल ट्री, या हॉटेलमध्ये इंडियन बिझनेस अँड प्रोफेशनल काऊन्सिलतर्फे ग्रीन माईंड्स, या  प्रदूषणविरहित पर्यावरणासाठी पुनर्वापर आणि चिरकाल टिकणारे उपाय, या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेस प्रमुख अतिथी म्हणून रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी संयुक्त अरब अमीरात सरकारचे  पुनर्वापर, पुनर्प्रक्रिया विषयाचे सल्लागार महेर अल काबी रीना वीज; विजय बैंस; समिअल्लाह खान; कार्तिक रमण आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश सर्व आघाड्यांवर सर्व क्षेत्रात प्रगती करीत असून संपूर्ण जगातून  भारतात उद्योग, व्यवसाय विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढत आहे. भारत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. संयुक्त अरब अमीरात आणि भारताने संयुक्तपणे प्रयत्न करून दोन्ही देशांत व्यापार-उद्योग वाढविण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

संयुक्त अरब अमीरातचे राजे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये विशेषतः दुबईत मोठ्या प्रमाणात भारतीय व्यापार आणि वास्तव्य करीत आहेत. त्यांना कोणताही त्रास नाही. त्यांना सरकारचे चांगले सहकार्य मिळत असते. भारताची राजधानी दिल्ली आहे आणि आर्थिक राजधानी मुंबई आहे तसेच संयुक्त अरब अमीरातची राजधानी अबुधाबी आहे आणि आर्थिक राजधानी दुबई आहे. संयुक्त अरब अमीरात आणि भारत या दोन्ही देशांनी मिळून पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देऊ; व्यापार-उद्योग वाढवू तसेच जागतिक पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करूया. भारतात मोदी सरकारच्या नेतृत्त्वात सौर ऊर्जेची मोठ्या प्रमाणात निर्मिती आणि वापर होत आहे. प्लास्टिकमुक्त शहरे करण्यासाठी भारतात प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने जगात सर्वच देशांनी पर्यावरण रक्षणाचा संवर्धनाचा विचार करावा असे आवाहनही रामदास आठवलेंनी केले.

या परिषदेस भारतातून रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, तोसिफ पाशा आणि जावेद अहमद उपस्थित होते. 

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content