Homeपब्लिक फिगरखदखद होती तर...

खदखद होती तर अजितदादांनी तेव्हाच बाहेर पडायचे ना!

२०१० ते २०१४ साली काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये अजित पवार होते. त्यांचा नाईलाज होता तर त्यांनी मंत्रीपदाची शपथ कशासाठी घेतली, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला.

कालच एका मुलाखतीत बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपण नाईलाजाने पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होतो, असे भाष्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना पटोले बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल अजित पवारांनी असे बोलावे ही अपेक्षा नाही. खदखद वाटत होती तर त्यावेळीच सोडून जायला हवे होते. राजकारणातील कोणीही मुख्यमंत्री व्हायची इच्छा बाळगली तर त्यात वावगे काहीच नाही. अजित पवार यांच्याकडे १४५चा बहुमताचा आकडा असेल तर त्यांनी जरूर मुख्यमंत्री व्हावे, असे ते म्हणाले.

पुलवामामध्ये अतिरेकी हल्ला झाला तेव्हा सत्यपाल मलिक जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यावेळच्या घटनेचे सत्य त्यांनी जनतेसमोर उघड केले. आपल्या जवानांवर केलेला तो भ्याड हल्ला आहे. त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले पाहिजे. पण, उत्तर न देता नरेंद्र मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणला म्हणूनच सत्यपाल मलिकांना सीबीआयकडून नोटीस पाठवण्यात आली आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.

मोदी सरकारच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा समेमिरा लावला जातो, हे चित्र आपण मागील काही वर्षांपासून पाहत आहोत. सत्यपाल मलिक हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. जम्मू-काश्मीरसह इतर राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांना मोदी सरकारनेच जबाबदारी दिली होती. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना पुलवामा घटना घडली. त्याची वस्तुस्थिती सत्यपाल मलिक यांनी मांडली. त्यासोबतच भ्रष्टाचाराचा मुद्दाही मांडला. मलिक यांच्या वक्तव्याने मोदी सरकारचा खरा चेहरा जनता कळला म्हणून त्यांचा आवाज बंद करण्यासाठी सीबीआयमार्फत नोटीस पाठवून गप्प करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

ना खाऊंगा, ना खाने दुंगा, म्हणाऱ्यांच्या पक्षातच आता भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकांना घेऊन वॉशिंग मशिनमध्ये धूऊन घेतात का? असा प्रश्न सामान्य जनताच विचारत आहे. भाजपाने भ्रष्टाचाराची नकली मालिका चालवली. त्याला जनता आता ओळखून आहे. भाजपामध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत. त्यांच्यावर मोदी सरकार कारवाई का करत नाही, असा सवालही त्यांनी केला.

Continue reading

बंगालमध्ये राजकीय ‘ग्रँड स्लॅम’! लिएंडर पेसला भाजपमध्ये ‘स्पेस’!!

भारताचा दिग्गज टेनिसपटू आणि 'कोलकाता बॉय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिएंडर पेस याने मंगळवारी नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून राजकीय खळबळ उडवली. बंगाली माध्यमांच्या मते, २०२१मध्ये गोव्यात ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश करणाऱ्या पेसने आता 'घासफूल'...

केरळमध्ये डाव्या आघाडीच्या सरकारसाठी मोदी प्रयत्नशील!

केरळमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी कन्नूर येथील जाहीर सभेत सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर कडाडून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केरळमध्ये डाव्या आघाडीचे...

नव्या बदलांसह ‘दिवाळखोरी’ लोकसभेत मंजूर!

लोकसभेने काल इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड (संशोधन) विधेयक, २०२५ दुरुस्त्यांसह मंजूर केले. वित्त व कॉर्पोरेट अफेअर्स मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या या विधेयकात १२ महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. हे विधेयक आता राज्यसभेकडे जाणार आहे, पण लोकसभेतील मंजुरीने...
Skip to content