Homeकल्चर +मुंबईतल्या अध्यात्मरंग महोत्सवास...

मुंबईतल्या अध्यात्मरंग महोत्सवास भरघोस प्रतिसाद

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गेली वीस वर्षे ‘अध्यात्मरंग महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत अनेक विचारवंतांची व्याख्याने, किर्तने, प्रवचने सादर करण्यात आली. यंदाही हा महोत्सव उत्साहात साजरा झाला. या वर्षी या महोत्सवात ‘आनंदवारी-नर्मदा आणि पंढरी’ या शीर्षकाखाली २ व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. श्रोत्यांनी या दोन्ही व्याख्यानांना उत्तम प्रतिसाद दिला.

उदयन् आचार्य यांचे ‘नर्मदा परिक्रमा-एक आनंदयात्रा’ या विषयावर व्याख्यान झाले. परिक्रमेतील त्यांचे अनुभव त्यांनी ओघवत्या शैलीत सांगितले. ते म्हणाले की, परिक्रमा ही एकट्याने करायची असते आणि वारी अनेकांना बरोबर घेऊन करायची असते. परिक्रमा कठीण असून परिक्रमा करणाऱ्यांची नितांत श्रद्धा असली तरच नर्मदामैया काळजी घेते असा अनुभव आहे. त्यांच्या व्याख्यानातून श्रोत्यांना परिक्रमेचा अनुभव घेतल्याचा आनंद मिळाला. उदयन् आचार्य यांनी स्वतः ३ वेळा परिक्रमा केली असून आता नर्मदा तटावरील महेश्वर येथील सप्तमातृका मंदिरात वर्षातील बराच काळ वास्तव्य करून परिक्रमावासींची सेवा करतात.

सुधीर महाबळ यांनी ‘एक तरी वारी अनुभवावी’ या विषयावर पंढरपूर वारीचे आणि परतवारीचे आपले अनुभव कथन केले. शहरात वाढलेल्या त्यांना अत्यंत भाविक असलेल्या खेडुतांबरोबरचे हृद्य अनुभव खूप काही शिकवून गेले असं ते म्हणाले. वारीची पदयात्रा ही अतिशय शिस्तबद्ध आणि आखीव असते. महाबळांनी सांगितलं की, ही या लाखो वारकऱ्यांची स्वयंशिस्त आहे. वारी म्हणजे ऐश्वर्यवारी आणि परतवारी म्हणजे वैराग्यवारी असंही ते सांगतात. ते स्वतः गेली अनेक वर्षं वारी आणि परतवारी श्रद्धापूर्वक करतात.

Continue reading

नोव्हेंबरपासून राज्यात हवामान कोरडे; मात्र 3-4 दिवस पावसाचेच!

यंदा उन्हाळ्यातच आलेला पाऊस हिवाळा सुरू झाला तरी मुक्काम हलवायला तयार नाही. मान्सून संपला; पण मान्सूनोत्तर अवकाळी पावसाचा खेळ अजूनही सुरूच आहे. आता बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तसेच ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात...

एका फ्लॅटचे दोन करताय? सावधान!

एका मोठ्या कुटुंबाला अधिक प्रायव्हसीची गरज आहे किंवा वाढत्या शहरात भाड्याने उत्पन्न मिळवण्याची संधी आहे, अशा अनेक कारणांमुळे मुंबईतील अनेकजण आपल्या मोठ्या अपार्टमेंट, फ्लॅटचे दोन भागांत विभाजन करण्याचा विचार करतात. हे एक सामान्य व्यावहारिक वास्तव आहे. पण, मुंबई उपनगरातील...

न्यायमूर्ती सूर्य कांत भारताचे पुढचे सरन्यायाधीश!

भारताचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी न्यायमूर्ती सूर्य कांत यांची भारताचे पुढचे म्हणजेच 53वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. ते 23 नोव्हेंबरला आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश गवई यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत...
Skip to content