Homeएनसर्कलराज्यात १२ची परीक्षा...

राज्यात १२ची परीक्षा २३ तर १०वीची २९ एप्रिलपासून!

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिलपासून तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी)ची लेखी परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू होणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.

मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, परीक्षामंडळ संचालक दिनकर पाटील उपस्थित होते.

इयत्ता 12 वीची प्रात्यक्षिक परीक्षा 1 एप्रिल ते  22 एप्रिल दरम्यान होईल तर लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल. या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै 2021च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल यादरम्यान होतील तर लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येतील. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. राज्यात इ. 9वी ते इ.12वीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून 18 जानेवारी 2021पासून 21 लाख 66 हजार 56 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत व 21 हजार 287 शाळा सुरू आहेत. यात एका दिवशी केवळ पन्नास टक्के उपस्थिती ठेवून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सुमारे 76.8% विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, अशी माहितीही प्रा. गायकवाड यांनी यावेळी दिली.

बालविवाह रोखण्यासाठी विशेष मोहीम

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू असल्यामुळे या कालावधीत पालकांकडून मुलींचे शिक्षण थांबवून त्यांची लग्ने लावून देण्याची शक्यता जास्त आहे. अशा स्वरूपाचे बालविवाह रोखण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

जादा फी वसुलीविरूद्ध योग्य बाजू मांडू

अनेक शाळांकडून पालकांकडे जादा फी वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्याविरूद्ध राज्य सरकारने आदेश जारी केला आहे. याविरूदध मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. तेथे योग्य ती बाजू मांडण्यात येईल, असेही प्रा. गायकवाड म्हणाल्या.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content