Homeकल्चर +हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात...

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून ते रोमच्या ऐतिहासिक आणि मोहक रस्त्यांपर्यंतच्या लोकेशन्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

कियारा अडवाणी म्हणाली की, “इथे अगदी योग्य प्रमाणात ऊन आणि सुखद गारवा होता. मला इथेच थांबावं, आराम करावा आणि या थर्मल पूलमध्ये पोहत राहवं असं सतत वाटत होतं. हे एकदम स्वप्नवत आणि मनमोहक आहे.”

कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस म्हणाला की, “टस्कनीने आम्हाला कमालीचं सौंदर्य दिले आहे. इथलं रंगसंगतीचं दृश्य अचूक आहे. ही लोकेशन गाण्याला एक वेगळी उंची देते.”

दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाले की, “या प्रेमगीतासाठी अशी पार्श्वभूमी हवी होती जी प्रेम, प्रवास आणि नात्यांची ऊर्जा दाखवू शकेल. दोन व्यक्ती प्रेमात आहेत आणि एकत्र जग पाहत आहेत, अशी भावना निर्माण करणारी लोकेशन म्हणून इटली निवडल्यावर मी खूप आनंदी होतो. रोममध्ये गेल्यावर मला वाटलं की, कोलोसियम, स्पॅनिश स्टेप्स आणि ट्रेवी फाउंटन या आयकॉनिक जागांवर चित्रिकरण करणं आवश्यक आहे. याठिकाणी शूटिंगसाठी परवानगी मिळवणं खूपच कठीण होतं, पण सुदैवाने सर्व काही जमून आलं आणि आम्ही त्या सर्व ठिकाणी शूट करू शकलो. हे गाणं तयार करताना संपूर्ण टीममध्ये एक सकारात्मक ऊर्जा होती. हे एक ‘फील गुड’ गाणं आहे. आम्हाला हे बनवताना खूप आनंद मिळाला आणि आम्ही प्रेक्षकांनाही तोच आनंद मिळेल अशी आशा करतो.”

‘वॉर 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केलं आहे आणि तो आदित्य चोप्रा यांनी निर्मित केलेला आहे. हा चित्रपट येत्या 14 ऑगस्टला हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Continue reading

पिता-पुत्राच्या कोठडी मृत्यूप्रकरणी ९ पोलिसांना फाशीची शिक्षा!

देशाला हादरवून सोडणाऱ्या तमिळनाडूतील 'जयराज आणि फेनिक्स' कोठडी मृत्यू प्रकरणात मदुराई येथील विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकरणी दोषी ठरलेल्या नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कायद्याचे रक्षकच जेव्हा अमानुष भक्षक बनतात, तेव्हा...

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...
Skip to content