Saturday, October 26, 2024
Homeमुंबई स्पेशलपाळीव प्राण्यांच्या नोंदणीसाठी...

पाळीव प्राण्यांच्या नोंदणीसाठी मुंबईत पालिकेचे घरोघरी सर्वेक्षण

बृहन्मुंबई महानगरपालिकेने यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ऍनिमल्स आणि झीमॅक्स टेक सोल्युशन प्रा. लि. या सेवाभावी संस्थेच्यावतीने मुंबईतील पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे महानगरातील विविध सदनिका, बंगले, सोसायटीमधील नागरिकांकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची माहिती संकलित करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी गट प्रत्येक सोसायटीला भेट देणार आहेत. मुंबईकर नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेऊन कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

प्राणी कल्याण करणे व त्यासोबतच प्राण्यांपासून मानवामध्ये होणारे संक्रमण टाळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे माणसांना होणाऱ्या संक्रमणाचा धोका कमी करणे तसेच श्वानांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने ‘मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प’ अंतर्गत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी नुकतेच निरंतर अभियान हाती घेतले आहे. त्यानंतर आता पाळीव प्राण्यांचीदेखील नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे

मुंबई शहरातील पाळीव प्राण्यांच्या लोकसंख्येबद्दल महत्त्वाची माहिती गोळा करण्यासाठी एक व्यापक सर्वेक्षण करत आहोत. यामध्ये प्राण्यांचे आरोग्य, लसीकरण स्थिती आणि नोंदणी याविषयी तपशील समाविष्ट असेल. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पालिकेचे प्रतिनिधी प्रत्येक सोसायटीला भेट देणार आहेत. पाळीव प्राण्यांच्या निरोगी आयुष्यासाठी तसेच रेबीज आणि लेप्टोस्पायरोसिस यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईकरांनीदेखील पालिकेला सहकार्य करावे. त्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर आपल्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची नोंद करावी, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.

https://www.pets-survey.org/bm

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content