Homeटॉप स्टोरी'निफ्टी'मध्ये 28 वर्षांनंतर...

‘निफ्टी’मध्ये 28 वर्षांनंतर ऐतिहासिक निरंतर घसरण!

भारतीय शेअर बाजार सध्या मंदीच्या तडाख्यात सापडलेला आहे. 1996नंतर तब्बल 28 वर्षांनंतर बाजार असा सलग घसरणीच्या चक्रव्यूहात फसलेला दिसत आहे. गेल्या 5 महिन्यांपासून शेअर बाजाराच्या निर्देशांक “निफ्टी”ने निगेटिव्ह रिटर्न दिलेले आहेत. या 5 महिन्यांत 15% घसरण नोंदविली गेली आहे. यापूर्वी जुलै ते नोव्हेंबर 1996 या काळात अशी सलग 29% घसरण बाजाराने पाहिलेली आहे. सध्या निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही आघाडीचे निर्देशांक आठ महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. निफ्टीला आता इतिहासात फक्त दोनदाच पाच महिन्यांची घसरण अनुभवावी लागली आहे, तर 1998 आणि 2001मध्ये चार महिन्यांची घसरण झाली आहे. निफ्टी निर्देशांक अस्तित्त्वात येण्यापूर्वी, सप्टेंबर 1994 ते एप्रिल 1995 या कालावधीत सलग आठ महिने ही बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण सेन्सेक्समध्ये नोंदवण्यात आली आहे.

चीनमधील नवीन कोरोना व्हायरस संदर्भात येणाऱ्या बातम्याही जगभरातील बाजारांना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. अजून त्याचा फारसा मोठा फटका जगभरातील बाजारांना कुठे बसलेला नाही. मात्र, चीनमधील नव्या रिसर्च रिपोर्टनंतर जगभरातील कोविड-19 लस उत्पादक कंपन्यांनी आपले उत्पादन वाढवायला सुरुवात केल्याच्या बातम्या येत आहेत. या संभाव्य साथीच्या आजाराशी संबंधित जोखमींबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाल्याने भारतीय बाजारातील नकारात्मक भावना तीव्र आहे.

यावेळच्या घसरणीत SIP नेही अनेक सर्वसामान्य गुंतवणूकदारांना कंगाल केले आहे. तब्बल 34 नामांकित इक्विटी म्यूच्युअल फंड्सनी कॉमन मॅनचे हजारो कोटी रुपये बुडवले आहेत. शेअर बाजारातूनही धास्तावलेल्या छोट्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी मोठे नुकसान सोसून बरेचसे भांडवल काढून घेतलेले आहे. शेअर बाजाराने निराश केलेला हा गुंतवणूकदार पुन्हा FD, RD, सोन्यातील पारंपरिक गुंतवणुकीकडे वळताना दिसत आहे. कमकुवत कॉर्पोरेट कमाई, सततचा घसरता परकीय गुंतवणूक प्रवाह आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे सध्या बाजारात गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला आहे, ज्यामुळे चार महिन्यांपूर्वीच्या विक्रमी उच्चांकावरून प्रमुख निर्देशांक आता बरेच खाली आले आहेत.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सल्ला:

1. सध्याच्या घसरणीत आपला लाँग टर्म गुंतवणुकीचा पैसा आजिबात काढून घेऊ नका. घाबरु नका, जुनी इंव्हेस्टमेंट कायम राहू द्या.

2. सध्याच्या स्थितीत कोणतीही नवी गुंतवणूक करू नका. बाजारातील दिशा व ट्रेंडचे चित्र पूर्ण क्लिअर होईपर्यंत शांत राहा, स्वस्थ बसा.

3. मार्जिन किंवा इंट्रा डे ट्रेड आजिबात करू नका.

4. हौस असेल तर गुंतवणूक आणि ट्रेड फक्त डिलिव्हरीत फंडामेंटली मजबूत निफ्टी 200 स्टॉक्समध्येच करा. पेनी स्टॉक्सच्या नादाला लागू नका.

5. ही वेळ बॉटम फिशिंगची आहे की नाही, ते अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे घसरलेल्या पातळीतील शेअरमध्ये गुंतवणुकीचा मोह टाळा. बाजारात आता डाऊनसाईड लिमिटेड असली तरी जागतिक अनिश्चिततेच्या या स्थितीत बाजार अजूनही घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

6. सध्याचे मळभ पूर्ण हटताच बाजार पुन्हा तेजीची उसळी घेण्याच्या टर्नअराऊंड स्थितीत येताच दीर्घकाळ गुंतवणुकीला (डिलिव्हरी ट्रेड) तयार राहा. ती लाईफटाईम संधी आजिबात गमावू नका.

Continue reading

का होतोय निरोगी आणि तरुण भारतीयांचा अचानक मृत्यू?

गेल्या काही काळापासून, निरोगी आणि तरुण भारतीयांच्या, विशेषतः तिशी आणि चाळीशीत असलेल्यांचा अचानक कोसळून मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. सिद्धार्थ शुक्ला आणि पुनीत राजकुमार यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांच्या बातम्यांपासून ते व्हायरल व्हिडिओंपर्यंत, या घटनांनी आपल्याला हादरवून सोडले आहे. जेव्हा आपण...

‘धुरंधर’मधले रहमान डकैतचे ‘ल्यारी’, जिथे फक्त रक्त भळभळते!

रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना अभिनित 'धुरंधर' या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच धुमाकूळ घातला नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक मोठी चर्चा सुरू केली आहे. या चित्रपटाने पाकिस्तानमधील कराची शहरातील 'ल्यारी' या वादग्रस्त भागाला आणि तेथील रहमान डकैत आणि एसपी...

काय आहे भवितव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे?

कोविड महामारी आणि त्यानंतर इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणावरील न्यायालयीन खटल्यांमुळे रखडलेली लोकशाहीची प्रक्रिया महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असला तरी उत्साह आणि अपेक्षांच्या या वातावरणात...
Skip to content