Homeटॉप स्टोरी.. म्हणून मंगळवारीच...

.. म्हणून मंगळवारीच अशोक चव्हाण झाले भाजपावासी!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा अनिश्चित झाल्यामुळे तसेच राज्यसभा निवडणुकीसाठी मतदार जाहीर करण्यात अडचण होऊ नये यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा भारतीय जनता पार्टीतला प्रवेश आज तातडीने उरकण्यात आला. अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असून उद्यापर्यंत जाहीर होणाऱ्या यादीत त्यांचे नाव असणार असल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या गुरूवारी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार होते. यात त्यांचा छत्रपती संभाजी नगर येथे एक कार्यक्रमही होता. परंतु पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या दौऱ्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली. त्यातच राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना त्याचदिवशी पक्षप्रवेश देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविणे शक्य होणार नाही. या साऱ्या बाबी लक्षात घेऊन आजच चव्हाण यांचा पक्षप्रवेश उरकून घेण्याचा निर्णय भाजपाच्या नेत्यांनी घेतला.

त्यानुसार दुपारी एक वाजल्यानंतर मुंबईत भाजपाच्या प्रदेश मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण तसेच त्यांचे समर्थक माजी आमदार अमर राजुरकर यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी चव्हाण यांनी रीतसर प्रवेशशुल्क देत पावती घेत प्रवेशातली कोणतीही कायदेशीर अडचण ठेवली नाही. त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसमधले जनाधार असलेले अनेक नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचे सांगितले. चव्हाण यांनी यावेळी भाजपाला मजबूत करण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण स्वीकारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content