Homeब्लॅक अँड व्हाईटआर्मी ऑफिसर असल्याचे...

आर्मी ऑफिसर असल्याचे भासवून डेन्टिस्टला घातला लाखाचा गंडा

आर्मी ऑफिसर असल्याचे भासवून एका डेंटिस्टची एक लाखाहून जास्त रकमेला ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या प्रकरणाचा छडा लावत दहिसर पोलिसांनी तक्रारदाराला फसविले गेलेली सर्व रक्कम परत मिळवून दिली आहे.

याबाबतची थोडक्यात हकीकत अशी. तक्रादार विपीन लक्ष्मणराव माहुरकर या 48 वर्षांच्या डॉक्टरचा स्वतःचा दातांचा दवाखाना आहे. 11/01/2024 रोजी सकाळी 11.00 वाजण्याच्या दरम्यान तक्रादार डॉक्यांटरांना 9824723979 हया अनोळखी क्रमांकावरून त्यांच्या ********49 हया नंबरवर दिपावली वर्मा नावाच्या महिलेचा फोन आला. समोरून बोलणाऱ्या महिलेने ‘मी आर्मीमधून बोलत आहे व आम्हाला आमच्या काही सैनिकांना तुमच्या दवाखान्यात क्लिनींगकरीता पाठवायचे आहे तर तुम्ही आम्हाला काही माहीती दया.’ असे सांगितले. त्याअनुषंगाने तक्रादाराने सदर महिलेला त्यांच्या साऊथ इंडियन बँक खाते क्र. *********04 व कोटक महिंद्रा बँक खाते क्र. ********7ची सर्व माहिती दिली. त्यानंतर सदर महिलेने सांगितले की, गेटपास बनवण्यासाठी व आर्मीच्या नियमांनुसार तुम्हाला 50 रू. भरावे लागतील. त्यानुसार तक्रादार डॉक्टरांनी 50 रू. पाठवले. त्यावर तक्रादाराला 100 रू. परत आले. त्यानंतर सदर महिलेने तक्रादाराला 50,000 रू. व 49,000 रू. पाठवायला सांगितले त्यानुसार तक्रादार यांनी त्यांच्या साऊथ इंडीयन बॅक खाते क्र. *********04 यामधुन 50,000 रू. व 49,000रू पाठवले. त्यानंतर तक्रादाराने पैसे परत मागितले असता सदर बँकेमध्ये पैसे रिफंड करता येत नसल्याने तुमचे दुसऱ्या बँकेचा खातेक्रमांक द्या, असे त्या महिलेने सांगितले.

त्यानंतर तक्रादाराने कोटक महिंद्रा बॅक खाते क्र. *******7ची सर्व माहिती दिली व त्यांच्या सांगण्यानुसार सदर कोटक महिंद्रा बॅक खाते क्र. ******07मधून 10,000 रू. पाठवले. त्यावर सदर महिलेने रू. 1000/- तक्रादाराला परत पाठवले. त्यानंतर तक्रादाराला कोणताही रिफंड आला नाही. त्यावरून आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रादाराच्या लक्षात आले.

त्यानंतर तक्रारदार डॉ. माहुरकर यांनी तत्काळ दहिसर पोलीस ठाणे येथील सायबर सेलमध्ये तक्रार केली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राजेश गुहाडे यांनी तक्रारदाराच्या गेलेल्या रक्कमेचा शोध घेतला. तक्रारदाराची ही रक्कम कोटक महिंद्रा बँक येथे गेल्याचे समजले. त्यानुसार गुहाडे यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या नोडलशी प्रथमतः कॉलद्वारे व नंतर मेलद्वारे संपर्क करून सदर अकाउंट फ्रिज करण्यास सांगितले व फॉलोअप घेऊन तक्रारदाराचे आर्थिक फसवणूक झालेले रुपये 1,09,950 /- त्यांना परत मिळवून देण्यात यश मिळवले.

पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक आयुक्त किशोर गायके, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राणी पुरी, दिवसपाळी पर्यवेक्षक सहा. पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर अधिकारी उपनिरीक्षक राजेश गुहाडे, पोलीस शिपाई नितीन चव्हाण, सुप्रिया कुराडे, श्रीकांत देशपांडे यांनी सदर रकमेचे तांत्रिक विश्लेषण करून, शोध घेऊन तक्रारदाराला त्यांची आर्थिक फसवणूक झालेली रक्कम परत केली.

Continue reading

अध्यात्मशास्त्र दीपावलीचे!

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा...

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...
Skip to content