Homeबॅक पेज'गोदावरी'ची नवीन ई-स्कूटर...

‘गोदावरी’ची नवीन ई-स्कूटर लॉन्च!

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स, या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकीच्‍या इब्‍लू श्रेणीच्‍या उत्‍पादक कंपनीने भारतातील पहिली फॅमिली ई-स्‍कूटर इब्‍लू फिओ एक्‍सच्‍या नवीन व्‍हेरिएण्‍टच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली.

हे कंपनीचे भारतातील ईव्‍ही दुचाकी विभागामधील दुसरे उत्‍पादन आहे. भारत ग्‍लोबल मोबिलिटी एक्‍स्‍पो २०२४मध्‍ये इब्‍लू फिओ एक्‍सचे अनावरण करण्‍यात आले होते. इब्‍लू फिओ एक्‍स आता २८ लिटर स्‍टोरेज स्‍पेससह ऑफर करण्‍यात येईल. या ई-स्‍कूटरमध्‍ये २.३६ केडब्‍ल्‍यू बॅटरी असेल आणि ११० किमी रेंज देईल. इब्‍लू फिओ एक्‍सची किंमत ९९,९९९ रूपये (एक्‍स-शोरूम) असेल.

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी हैदर खान म्‍हणाले की, इब्‍लू फिओ एक्‍स आमच्‍या विद्यमान उत्‍पादनाबाबत ग्राहकांच्‍या अभिप्रायासह डिझाइन करण्‍यात आली आहे. या वेईकलमध्‍ये कालातीत डिझाइन असून उच्‍च दर्जाचा आरामदायीपणा देण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे. त्यात कार्यक्षमता व सुरक्षिततेचे संयोजन आहे, ज्‍यामुळे पैशाचे उत्तम मोल मिळते. ईव्‍ही दुचाकी विभागामधील विस्‍तारीकरणासह कंपनी भारतातील नेक्‍स्ट जनरेशन मोबिलिटीप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आहे.

ते पुढे म्‍हणाले की, आम्‍हाला आमच्‍या विद्यमान ईव्‍ही उत्‍पादनांना मिळालेल्‍या प्रतिसादाचा आनंद होत आहे आणि भारतभरातील प्रबळ रिटेल नेटवर्कसह आम्‍ही अधिकाधिक ग्राहकांच्‍या मागण्‍यांची पूर्तता करू शकतो. ईव्‍ही दुचाकी विभागाने भारतात गेल्‍या काही वर्षांमध्‍ये उल्‍लेखनीय प्रगती केलेली आहे आणि आम्‍हाला विश्‍वास आहे की इब्‍लू फिओ एक्‍स नेक्‍स्‍ट-जनरेशन ग्राहकांच्‍या अपेक्षा व महत्त्वाकांक्षांची पूर्तता करेल. ५०० इब्‍लू फिओ एक्‍स प्री-ऑर्डर्समधून ग्राहकांचा आमच्‍या ब्रँडवरील विश्‍वास दिसून येतो.

इब्‍लू फिओ एक्‍स २.३६ केडब्‍ल्‍यू लि-आयन बॅटरी उच्‍च पॉवरसाठी ११० एनएम सर्वोच्‍च टॉर्कची निर्मिती करते. या ई-स्‍कूटरमध्ये तीन ड्रायव्हिंग मोड्स इकॉनॉमी, नॉर्मल आणि पॉवर राइडरच्‍या ड्रायव्हिंग स्‍टाइलला अनुसरून आहेत. तसेच ई-स्‍कूटरच्‍या विशिष्‍टतेमध्‍ये अधिक भर करतात. लांबच्‍या प्रवासादरम्‍यान आरामदायी प्रवासासाठी ६० किमी/तासची अव्‍वल गती मिळते. ही ई-स्‍कूटर सियान ब्‍ल्‍यू, वाइन रेड, जेट ब्‍लॅक, टेलि ग्रे, ट्रॅफिक व्‍हाइट या पाच लक्षवेधक रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात ७.४ इंच डिजिटल फुल कलर डिस्‍प्‍लेसह वेईकलची माहिती आहे, ज्‍यामध्‍ये सर्विस अलर्ट, साइड स्‍टॅण्‍ड सेन्‍सर, ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी, नेव्हिगेशन असिस्‍टण्‍ट, इनकमिंग मेसेज अलर्ट, कॉल अलर्ट, मोड्स डिस्‍प्‍ले, रिव्‍हर्स इंडिकेटर, बॅटरी एसओसी इंडिकेटर, थ्रॉटल फॉल्‍ट सेन्‍सर, मोटर फॉल्‍ट सेन्‍सर, बॅटरी अलर्ट आणि हेल्‍मेट इंडिकेटरचा समावेश आहे. कंपनी ३ वर्ष आणि ३०,००० किमीची वॉरंटीही देते.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content