केंद्र सरकारने सोमवार, 22 जानेवारी 2024 रोजी (दुपारी 2:30 वाजेपर्यंत) अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जाहीर केलेल्या अर्ध्या दिवसाच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने अर्जदारांना त्यांच्या ठरलेल्या भेटीच्या वेळा पुनर्निर्धारित करण्याची विनंती केली आहे.
केंद्र सरकारची सर्व कार्यालये 22 जानेवारी 2024 रोजी अडीच वाजेपर्यंत अर्ध्या दिवसासाठी बंद राहतील. हे लक्षात घेऊन, गोव्यातील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने पारपत्र अर्जदारांना विनंती केली आहे ज्यांनी 22 जानेवारी 2024 (दुपारी 2:30 वाजेपर्यंत) पणजीतील पारपत्र सेवा केंद्र आणि मडगाव येथील पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्र येथे पारपत्रासाठी भेटीची वेळ निश्चित केली आहे त्यांनी त्यांच्या ठरलेल्या भेटीच्या वेळा पुनर्निर्धारित कराव्या, अशी विनंती केली आहे. भेटीच्या वेळेचे पुनर्निर्धारण अधिकृत संकेतस्थळावर लॉगइन करून किंवा एमपासपोर्ट सेवा मोबाइल ॲप वापरून केले जाऊ शकते.
प्रभावित अर्जदारांच्या सोय सुनिश्चित करण्यासाठी या सुट्टीमुळे ज्यांच्या भेटी रद्द झाल्या आहेत त्यांच्यासाठी अतिरिक्त भेटीचा प्रयत्न उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींना भेटीच्या वेळा पुनर्निर्धारित करण्याबाबत माहिती देण्यासाठी एसएमएसद्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत.