Homeचिट चॅटप्रजासत्ताक दिनाच्या वीकेण्डला...

प्रजासत्ताक दिनाच्या वीकेण्डला पर्यटकांचा ओघ गोवा, दुबईकडे!

पर्यटन क्षेत्र पूर्वपदावर येत असताना भारतीय पर्यटक प्रजासत्ताक दिनासाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय गंतव्यांवर पर्यटनावर जाण्यामध्ये रूची दाखवत आहेत. ही बाब कायकवर (KAYAK) विमानसेवा शोधांमध्ये झालेल्या वाढीमधून दिसून येते. प्रजासत्ताक दिनाच्या साप्ताहिक सुट्टीत सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या गंतव्यस्थानांमध्ये गोवा, मुंबई, नवी दिल्लीसह दुबई, बँकॉक आदी स्थानांचा समावेश आहे.

जगातील आघाडीच्या ट्रॅव्हल सर्च इंजिन कायकला प्रजासत्ताक दिनाच्या साप्ताहिक सुट्टी कालावधीसाठी विमानसेवा शोधांमध्ये लक्षणीय वाढ दिसण्यात आली. २०१९मध्ये याच सर्च कालावधीच्या तुलनेत यंदा देशांतर्गत रिटर्न विमानसेवा शोधांमध्ये जवळपास १८५ टक्क्यांची वाढ झाली. आशियासाठी विमानसेवा शोधांमध्ये जवळपास १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. लांब अंतरापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा शोधांमध्ये जवळपास २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सर्व किंमती व सर्च डेटा २६ जानेवारी ते २९ जानेवारी २०२३पर्यंतच्या प्रवासासाठी शोधांवर (१.११.२०२२ ते ०१.०१.२०२३) आधरित आहेत. याची तुलना २६ जानेवारी ते २९ जानेवारी २०२०पर्यंतच्या प्रवासासाठीच्या शोधांसोबत (०१.११.२०१९ ते ०१.०१.२०२०) करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक

कायक इंडियाचे कंट्री मॅनेजर तरूण तहीलियानी म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाच्या आसपास लाँग वीकेण्डचा उत्तम कालावधी भारतीयांना प्रवास करण्यास अत्यंत प्रेरणादायी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आसपास देशांतर्गत विमानसेवेमध्ये कोरोना महामारीपूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा १८५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आमच्या डेटामधून आंतरराष्ट्रीय विमानसेवा शोधांमध्ये जवळपास २४ टक्के वाढ झाल्याचेदेखील निदर्शनास येते. यामधून दिसून येते की भारतीयांनी लाँग वीकेण्डसाठी त्यांच्या लांब अंतरापर्यंतच्या ट्रिप्ससाठी स्मार्टपणे नियोजन केले आहे.

या कालावधीदरम्यान भारतीय पर्यटकांनी सर्वाधिक शोध घेतलेले गंतव्यस्थाने आहेत गोवा, दुबई, नवी दिल्ली, मुंबई व बँकॉक. अजूनही नियोजन करत असलेल्यांसाठी कायकडॉटकोडॉटइनसारख्या वेबसाइट्स प्रबळ नियोजन साधने व वैशिष्ट्ये देतात. त्यामुळे प्रवाशांना पैसे वाचवण्यास आणि स्थिर शोध फिल्टर, किंमत सूचना व किंमतीचा अंदाज, साधने यासारख्या गोष्टींसह आत्मविश्वासपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतात, असेही ते म्हणाले.

रिपब्लिक डे लाँग वीकेण्ड सर्च इनसाइट्समध्ये देशांतर्गत रिटर्न इकॉनॉमी फ्लाइटसाठी सरासरी किंमत जवळपास १०,११३ रूपये (२०१९च्या तुलनेत जवळपास ४१ टक्के वाढ) असल्याचे दिसून आले. तसेच लांब अंतराच्या आंतरराष्ट्रीय रिटर्न इकॉनॉमी फ्लाइटसाठी सरासरी किंमत जवळपास ७३,५७६ रूपये (२०१९च्या तुलनेत जवळपास ३२ टक्क्यांची वाढ) आहे. आशियाकरिता रिटर्न इकॉनॉमी फ्लाइटसाठी सरासरी किंमत जवळपास २,८४६ रूपये (२०१९च्या तुलनेत जवळपास ३७ टक्क्यांची वाढ) आहे. देशांतर्गत ३–४ स्‍टार हॉटेलमधील वन नाइटसाठी सरासरी किंमत जवळपास ६,३०५ रूपये आहे, असेही आढळून आले आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content