Homeकल्चर +उद्यापासून रोजच्या रोज...

उद्यापासून रोजच्या रोज मिळवा शिर्डीच्या साईंची मूर्ती!

खास महाराष्ट्रातल्या साई भक्तांसाठी फक्त मराठी वाहिनीने “साईबाबा श्रद्धा आणि सबुरी’’ ही मराठी मालिका आणली. या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून अल्पावधीतच अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. उद्या, ३ मे म्हणजेच सोमवारपासून फक्त मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘साईबाबा श्रद्धा आणि सबुरी’ ह्या मालिकेत विचारल्या जाणाऱ्या एका सोप्या प्रश्नाचे योग्य उत्तर ८४४६४१९०९१ ह्या व्हॉट्स एप नंबरवर पाठविणाऱ्या ५ भाग्यवान विजेत्यांना शिर्डी साईबाबांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेली अमूल्य साईमूर्तीची अलौकिक भेट आणि संपूर्ण पूजा सामुग्री थेट शिर्डीवरुन विजेत्यांच्या घरी पाठविली जाणार आहे.

महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी आपल्या लाडक्या साईबाबांवर ‘फक्त मराठी’ वाहिनीने ‘साईबाबा श्रद्धा आणि सबुरी’ ही मराठी मालिका तयार करण्याचे ठरविले आणि १५ मार्च २०२१पासून ही मालिका या वाहिनीवर प्रसारित होऊ लागली. या मालिकेच्या चित्रिकरणासाठी भव्य सेट कलादिग्दर्शक आणि निर्माते अजित दांडेकरांनी मालाड, मुंबईतील ‘कलावंत’ स्टुडिओमध्ये उभा करून जणू प्रती शिर्डीच स्थापन केली.

आकर्षक सादरीकरणामुळे ही मालिका महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात प्रेक्षक आवडीने पाहू लागले. मात्र, पुन्हा महाराष्ट्रात संचारबंदीचा निर्णय झाल्याने पुढील सर्व भागांचे चित्रिकरण आम्हाला थांबवावे लागले. प्रेक्षकांचा कौल पाहून १९ एप्रिलपासून वाहिनीने पहिल्या भागापासून मालिकेचे पुन्हा प्रसारण सुरू केले आणि प्रेक्षकांकडून पुन्हा पूर्वीसारखाच प्रतिसाद मिळू लागला. प्रेक्षकांसोबत वाहिनीचं झालेलं नातं असच कायम घट्ट राहावं याकरिता ही प्रश्नमंजूषा आमच्यात दुवा ठरणार आहे. लॉकडाऊनमुळे भक्तांना इच्छा असूनही प्रत्यक्ष शिर्डीला जाता येत नाही. त्यामुळे आमच्या वाहिनीकडून भाग्यवान विजेत्यांना मिळणारी ही विशेष भेट अनोखी असल्याचे फक्त मराठी वाहिनीचे बिझनेस हेड श्याम मळेकर म्हणाले.

वेगळ्या, पण नैसर्गिक सादरीकरणामुळे ही मालिका मराठी माणसांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. संकटकाळी शिर्डीच्या वारीची आणि साईंच्या दर्शनाची आस आता होईल पूर्ण घरच्या घरी.. येईल प्रचिती साई लीलेची. साईलीलेचा अनुभव घ्या.. पाहात राहा साईबाबा-श्रद्धा आणि सबुरी, रोज रात्री ८.०० वाजता फक्त मराठी वाहिनीवर.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content