संपूर्ण देशभरातील विविध स्थानांसाठी 1:10K स्केलची उच्च रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमा प्रदान करण्यासाठी व्हिज्युअलायझेशन आणि नियोजनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ग्रामीण भू-अभिलेखासाठी ‘भुवन पंचायत (आवृत्ती. 4.0)’ पोर्टल आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इस्रो) विकसित केलेल्या “आपत्कालीन व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय डेटाबेस (एनडीइएम आवृत्ती. 5.0)” या दोन जिओपोर्टलचे अनावरण केंद्रीय भू विज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पृथ्वी भवन येथे केले.
आम्ही केवळ रॉकेट प्रक्षेपित करून अंतराळात पोहोचलो नाही तर आम्ही आकाशातून पृथ्वीचे मॅपिंगदेखील करत आहोत. अंतराळ-तंत्रज्ञानाने अक्षरशः प्रत्येक घरात प्रवेश केला आहे. अंतराळातील विकासाचा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर बहुआयामी प्रभाव पडेल मग ते टेलिमेडिसिन
असो, डिजिटल इंडिया असो. मानवरहित रेल्वे क्रॉसिंग ओळखणे असो असा विश्वास असणाऱ्या अंतराळ तंत्रज्ञानाचे जनक विक्रम साराभाई यांचा दृष्टिकोन आपण योग्यरीत्या पुढे नेत आहोत असे, डॉ. सिंह यावेळी म्हणाले.
पंचायतींमधील तळागाळातील नागरिकांना सक्षम करण्यासाठी ‘भुवन पंचायत पोर्टल’चे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, जमिनीच्या नोंदींसाठी स्थानिक प्रशासनावर अवलंबून राहण्याची गरज कमी करून आणि डिजिटलायझेशन आणि जमीन महसूल व्यवस्थापनाद्वारे भूमी अभिलेख व्यवस्थापनात क्रांती घडवून आणून त्यांना या सेवांचा लाभ घेण्याची परवानगी देण्यासाठी तळागाळातील नागरिकांना सक्षम करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. ही साधने नागरिकांकडून प्राप्त माहितीनुसार अद्ययावत डेटा प्रदान करतील आणि तळागाळातील भ्रष्टाचार कमी करतील.