Monday, November 4, 2024
Homeपब्लिक फिगरजनरल उपेंद्र द्विवेदी...

जनरल उपेंद्र द्विवेदी भारताचे नवे लष्करप्रमुख!

जनरल उपेंद्र द्विवेदी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम आता भारताचे नवे लष्करप्रमुख झाले. काल त्यांनी जनरल मनोज पांडे, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी यांच्याकडून 30वे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. जनरल मनोज पांडे काल 30 जून 2024 रोजी चार दशकांहून अधिक काळ देशसेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाले.

जनरल उपेंद्र द्विवेदी एक कुशल लष्करी अधिकारी असून त्यांनी सशस्त्र दलात 40 वर्षे सेवा केली आहे.  मध्य प्रदेशातील रीवा येथील सैनिक महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले जनरल द्विवेदी यांना 1984मध्ये जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले होते.

तांत्रिक प्रगती आणि आधुनिक युद्धाच्या बदलत्या पद्धतीमुळे सुरक्षा क्षेत्रातील आव्हाने अधिक स्पष्ट होत असताना जागतिक भू-सामरिक वातावरण गतिमान झाल्याच्या  काळात त्यांनी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. राष्ट्रसमोर उभ्या असलेल्या वाढत्या सुरक्षा धोक्यांचा सामना करण्यासाठी परिचालन तयारी करणे हे लष्करप्रमुखांचे मुख्य केंद्रित क्षेत्र म्हणून ठळकपणे ओळखले जाईल. त्याचवेळी देशाचे संरक्षण भक्कम करण्यासाठी असंख्य अपारंपरिक सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी एक केंद्रित प्रतिसाद रणनीती तयार करणे हेदेखील लष्करप्रमुखांचे प्राधान्य क्षेत्र असेल.

अनपेक्षित संकटांना तोंड देण्यासाठी प्रभावीपणे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचा अनुभव जनरल द्विवेदींना आहे. त्यांनी विविध महत्त्वपूर्ण पदांवर काम केले असून राष्ट्रीय सुरक्षेतील ग्रे झोन परिस्थितीचा सामना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जनरल द्विवेदी यांना सुरक्षा क्षेत्रातील आधुनिक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाची सखोल माहिती आहे तसेच ते परिचालन प्रभावीपणा वाढविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि लष्करी प्रणाली एकीकृत करण्याचा विचारपूर्वक दृष्टीकोन बाळगून आहेत. आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून आधुनिकीकरण आणि क्षमता विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय लष्कराच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना त्यांच्या या दृष्टीकोनातून एकरूपता मिळते.

चेटवूड  ब्रीदवाक्यावर दृढ विश्वास असलेले आणि त्याचे पाईक असलेले जनरल द्विवेदी विश्वासाच्या संस्कृतीला प्रोत्साहन, कनिष्ठ अधिकाऱ्यांचे सक्षमीकरण, सैनिकांचे कल्याण तसेच माजी सैनिक आणि वीर नारींचे कल्याण यावरदेखील लक्ष केंद्रित करतील.

Continue reading

आज भाऊबीज (यमद्वितीया)!

आज भाऊबीज. या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखाच्या...

दिवाळीत आग लागल्यास फोन करा १०१ किंवा १९१६ क्रमांकावर!

दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. दिवाळीत फटाके फोडताना लहान मुलांची जास्त काळजी घ्‍यावी. फटाके रात्री १० वाजेपर्यंत फोडावेत. या काळात आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तत्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. 'दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे...
Skip to content