Homeहेल्थ इज वेल्थपुण्यातल्या जीन हेल्थ...

पुण्यातल्या जीन हेल्थ लॅबसाठी महाराष्ट्र नॅचरल गॅसचा निधी 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुण्यातल्या जीन हेल्थ लॅबकरीता महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या सी.एस.आर. फंडातून निधी प्राप्त झाला आहे. पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात डॉ. घारपुरे बंगल्यात उभारण्यात आलेल्या ‘जीन हेल्थ्य लॅब’मध्ये मुंबईतले टाटा कॅन्सर हॉस्पिटल, पुण्याचे ससून हॉस्पिटल आदी  रुग्णालयांमधील अनेक शास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध डॉक्टर रुग्णांना मदत व समुपदेशनासाठी सेवा देतात.

राज्यातल्या अन्य भागातील रुग्णांचे जनुकीय चाचण्यांसाठी नमुने संकलित करुन पुणे येथे आणण्यासाठी कुरिअर कोल्ड-चेन लॉजिस्टिक कंपन्यांशी करार करण्यात येणार आहे, जेणेकरुन जनुकीय चाचण्या कमी वेळात पुण्यातल्या केंद्रीय जीन हेल्थ लॅबमध्ये आणणे शक्य होईल. विद्यापीठाच्या विविध उपक्रमांसाठी खाजगी संस्था व कंपन्याकडून सी. एस. आर. फंडातून मोठया प्रमाणात निधी मिळावा याकरीता दत्ता नाडकर्णी परिश्रम घेत आहेत. विद्यापीठाचे पुणे विभागीय कार्यालयातील चेअर प्रोफेसर ऑफ कॅन्सर जेनेटिक रिसर्चच्या डॉ. अनुराधा चौगुले यांच्या मार्गदर्शनात जीन हेल्थ लॅबचे कामकाज सुरू आहे.

विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प.,  वि.से.प. यांनी सांगितले की, समाजातील आर्थिकदृष्टया वंचित रुग्णांना जनुकीय आणि अनुवांशिक चाचणी आदी जनुकीय बाबींशी निगडीत आरोग्य समस्यांची चाचणी अत्यल्प खर्चात करता यावी यासाठी जीन हेल्थ लॅबची स्थापना करण्यात आली आहे. या लॅबकरीता नवीन उपकरण खरेदीसाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या सी.एस.आर. फंडातून मिळालेल्या निधीमुळे आर्थिक पाठबळ मिळाले आहे.

अनुवांशिक विकारांचे निदान करण्यासाठी जीनोमिक आणि अनुवांशिक चाचण्या करण्यात येतात. यामध्ये डाऊन्स सिंड्रोम, थॅलेसेमिया, सिस्टिक फायब्रोसिस, सिकलसेल, अॅनिमिया, कर्करोगाशी संबंधित आजारात फुफ्फुस, स्तन, रक्ताचा ल्युकेमिया आदी आजारांत जनुकीय चाचण्या करणे अनिवार्य असते. गरीब रुग्णांना कमी खर्चात जनुकीय चाचण्या करता याव्यात यासाठी लॅबची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णांना उपचार, रुग्णालयात दाखल होण्याचा समावेश आहे. या अनुषंगाने जनुकीय आजाराच्या चाचण्यांकरीता तातडीने गरीब रुग्णांना सेवा देता यावी यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content