Homeडेली पल्सश्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी...

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर प्रवेशाबद्दल मत व्यक्त केले.

१९९५पासून शिवसेनेचा बालेकिल्ला श्रीवर्धन राहिला होता. त्यावेळी राजकीय संघर्ष होता. पण कोणताही मनभेद नव्हता. मी जेव्हा या मतदारसंघात निवडून आलो, त्यानंतर परिवर्तन घडून आले. तुमची पक्षाशी निष्ठा राहिली म्हणून मला तिथे कमी मतदान मिळाले अशी कबुलीही तटकरे यांनी दिली. तुमच्या धाटणीला बाजूला सारून तुम्ही धर्मनिरपेक्ष विचारांशी बांधील झाला आहात. हा श्रीवर्धनच्या राजकीय इतिहासात दिवस उजाडला आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी शिवसेनेच्या उबाठाचे रायगड संपर्कप्रमुख सुजित तांदळेकर, श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती बाबुराव चोरगे, कारीवणे गावच्या सरपंच गीता चोरगे, जगन्नाथ चाळके, गणेश निर्मळ, बबन जोशी, मालती पवार, जागृती चाळके, रोशन मोरे यांच्यासह मराठा, कुणबी समाज संघटनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनीही जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे, राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, आमदार इद्रीस नायकवडी, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, सुभाष केकाणे आदी उपस्थित होते.

Continue reading

सीएसटीएमला उभा राहणार छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या देशातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन दिले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे, अशी...

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात तयार होतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...
Skip to content