भारताचा अग्रगण्य इन्श्युअरटेक ब्रॅण्ड इन्श्युरन्सदेखोने अलीकडेच स्वराशी ‘विल राइज अगेन’, या करिअर ब्रेकवर असलेल्या महिलांना पुन्हा कामावर रुजू होण्यावर लक्ष केंद्रित करणारा उपक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी कंपनीने, “दी मॅग्निफिकन्ट मेरी कोम” यांना आमंत्रित केले. आपल्या करिअरमधून किमान वर्षभराचा अंतराळ घेतलेल्या महिलांना कामावर परतण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे. या महिलांना समान संधी, हक्क आणि मोबदला देण्याप्रती हा कार्यक्रम समर्पित आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून कामाच्या ठिकाणी त्यांना न्याय्य वागणूक दिली जावी, त्यांच्या कामाची दखल घेतली जावी याची दक्षता घेतली जाणार आहे. मेरी कोम यांनी आपल्या बॉक्सिंग क्षेत्रातील वाटचालीमध्ये एक करिअर ब्रेक घेतला होता आणि त्यानंतर आपल्या क्षेत्रात परतल्यावर त्यांनी जिंकलेली ऑलिम्पिक पदके आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप्स म्हणजे कमबॅक कसा असावा याचे आदर्श उदाहरण आहे.
कामावर परतरणाऱ्या महिलांना स्वराद्वारे समान वेतन आणि संधी तर दिली जाणारच आहे, पण त्याचबरोबर या महिलांना पूर्वापार चालत आलेल्या समजूतींच्या चौकटी मोडता याव्यात, आपला आत्मविश्वास पुन्हा मिळविता यावा, एखाद्या पदासाठी उमेदवार म्हणून आपल्या सुयोग्यतेचे पुन:सादरीकरण करता यावे यासाठी त्यांची मदत करण्याच्या हेतूने तसेच त्यांना कॉर्पोरेट क्षेत्रातून आत्मविश्वासाने मार्ग शोधण्यासाठी तयार करण्यासाठी इन्श्युरन्सदेखोकडून त्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. ‘ती’ नव्याने भरारी घेईल असे सांगणाऱ्या ‘शी विल राइज अगेन’ या संदेशाचे स्वरा हे लघुरूप आहे आणि महिलांच्या कामावर परतण्याच्या प्रवासामध्ये त्यांना पाठबळ देण्याप्रती ब्रॅण्डची बांधिलकी त्यात प्रतिबिंबित झाली आहे.
महिला सक्षमीकरणाशी असलेल्या आपल्या दीर्घकालीन बांधिलकीचा भाग म्हणून दरवर्षी असा उपक्रम राबविण्याचा आणि २०३०पर्यंत आपल्या करिअर ब्रेकवरून परतण्यासाठी तयार असलेल्या किमान १०,००० महिलांना इन्श्युरन्सदेखो रुजू करून घेण्याचा व प्रशिक्षित करण्याचा इन्श्युरन्सदेखोचा मानस आहे.
इन्श्युरन्सदेखोचे सीईओ आणि संस्थापक अंकित अग्रवाल म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक जगामध्येही टिकून राहण्याशी बांधिलकी जपणाऱ्या महिलांप्रती माझ्या मनात आत्यंतिक आदर आहे. आमच्या टीममध्ये अनेक महिला आहेत, ज्या आई, पत्नी आणि मुलगी अशा अनेक जबाबदाऱ्या निभवित असतात व त्याचवेळी त्या अतिशय प्रतिभाशाली व्यक्तीही असतात. इन्शुरन्सदेखोमध्ये आम्ही आमच्या महिला व्यावसायिकांना आपापल्या करिअर्समध्ये वाढीच्या भरपूर संधी मिळाव्यात याची काळजी घेतो. ‘स्वरा’च्या साथीने आम्ही करिअरमध्ये अंतराळ घेतलेल्या अधिकाधिक महिलांना आपल्या मनुष्यबळामध्ये सामावून घेण्यावर इतकेचनव्हे तर त्यांना कॉर्पोरेट शिड्या सहजतेने चढता याव्यात यासाठी त्यांना योग्यप्रकारे प्रशिक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करू.
इन्श्युरन्सदेखोच्या सीएचआरओ दिव्या मोहन म्हणाल्या की, आम्ही विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांशी बोललो, करिअर ब्रेकनंतर पुन्हा एकदा कर्मचारी म्हणून आपल्या क्षेत्रात रुजू होण्याचा प्रयत्न करताना आपल्याला कोणकोणती आव्हाने आली हे त्यांनी आम्हाला सांगितले. कुटुंबाच्या जबाबदारीपासून ते आरोग्यसमस्यांपर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे नोकरी सोडून दिल्यावर आता आपल्याला कदाचित कॉर्पोरेट जगातील आधीचे स्थान पुन्हा नाही मळविता येणार, अशी भीती त्यांना वाटत असते. त्यांच्या याच मानसिकतेवर लक्ष केंद्रित करणे आणि कॉर्पोरेट जगात अधिक प्रभावीपणे मार्ग शोधण्यासाठीचा आत्मविश्वास त्यांच्या मनात रुजविणे हा “SWRA”चा प्राथमिक हेतू आहे.