Homeचिट चॅटविनोबा भावेंच्या अनुयायी...

विनोबा भावेंच्या अनुयायी माधुरी रावकर यांचे निधन

आचार्य विनोबा भावेंचे सान्निध्य व आशीर्वाद लाभलेल्या, माधुरी रावकर यांचे अल्पशा आजारानंतर आज, २४ जून रोजी मुंबईत निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या.

विनोबांच्या जन्मस्थानाशी त्यांचा दीर्घकाळ निकटचा संबंध होता. विनोबांचे निकटवर्ती व ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते दिवंगत मधु रावकर यांच्या त्या सुविद्य पत्नी होत. विनोबांना भेटून व त्यांचा आशीर्वाद घेऊन मधु-माधुरी यांनी विवाह केला होता.

मधु रावकर यांचा विनोबांच्या भूदान यात्रेतील सहभाग, गोवा मुक्तीलढा व संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन तसेच विनोबांच्या विचारांना वाहिलेले ‘युगारंभ’ या साप्ताहिक/दैनिक या सर्व कार्यात माधुरीताईंचा सक्रिय सहभाग होता. मधु रावकर यांच्या ‘युगारंभ’ साप्ताहिकातील लेखावर सनातनी हिंदुत्ववाद्यांनी गोवा व सावंतवाडी येथे दोन केस कोर्टात टाकल्या होत्या. मधु रावकर गेल्यानंतरही केस माधुरीताई लढवत राहिल्या व जिंकल्याही!

माधुरीताईंच्या पश्चात सरस्वती, प्रज्ञा, प्रसन्ना व प्रसाद अशी मुले व नातवंडे आहेत. सरस्वती ह्या विनोबा जन्मस्थानाच्या उपक्रमात सक्रिय असून मुंबई आकाशवाणीवर उच्च पदावर कार्यरत आहेत. प्रसाद एका नामांकित दैनिकात संपादकीय विभागात उच्च पदावर कार्यरत आहेत. संपूर्ण रावकर कुटुंब आजही विनोबांच्या कार्यात कार्यरत आहेत.

मधु रावकर यांच्या अस्थी विनोबांच्या जन्मस्थानी जेथे विसर्जित करण्यात आल्या तेथेच आता माधुरीताई यांच्याही अस्थी विसर्जित करण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content