Homeहेल्थ इज वेल्थमुंबईत आयोजित झाली...

मुंबईत आयोजित झाली मधुमेहपूर्व स्थितीवर पहिलीच परिषद

लाइफनेस सायन्स इन्स्टिट्यूटतर्फे ‘प्री-डायबेटिस टू डायबेटिस: द ट्रॅजेक्टरी ऑफ कन्सर्न’ म्हणजेच मधुमेहपूर्व स्थिती ते मधुमेह, या विषयावर दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नुकतीच जगातील अशा प्रकारची ही पहिलीच परिषद पार पडली.   

‘प्री-डायबेटिस (मधुमेहपूर्व स्थिती)’ ही गंभीर आरोग्यविषयक अवस्था आहे. या टप्प्यात रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढलेली असते. पण टाइप 2 मधुमेहाचे निदान करण्याएवढी जास्त वाढलेली नसते. इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोजद्वारे निश्चित केल्या जाणाऱ्या मधुमेहपूर्व अवस्थेचे जागतिक प्रचलन 2021 सालात 5.8% (298 दशलक्ष) होते आणि 2045मध्ये ते 6.5 टक्क्यांपर्यंत जाणार (414 दशलक्ष) असा अंदाज आहे. आयसीएमआर-आयएनडीएबी यांच्याद्वारे अलीकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, भारतातील सुमारे 15.4% शहरी लोकसंख्या आणि 15.2% ग्रामीण लोकसंख्या मधुमेहपूर्व स्थितीत आहे. एकंदर प्रचलन 15.3% आहे.

या मोठ्या लोकसंख्येला मधुमेह होण्यापासून कसे वाचवायचे यावर या परिषदेत गंभीर आणि सविस्तर चर्चा झाली. प्रख्यात मधुमेहतज्ज्ञ पद्मश्री डॉ. व्ही. मोहन यांच्या हस्ते या परिषेदेचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी व्ही. मोहन यांनी मधुमेहपूर्व स्थितिवर अशा प्रकारची परिषद आयोजित केल्याबद्दल एलएसआयचे अभिनंदन केले आणि जगाला मधुमेहाची राजधानी होऊ देऊ नये यासाठी काय करायला हवे याचे सविस्तर विवेचन केले.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी डॉ. दक्षा शहा यांनी लोकसंख्येतील मधुमेह रोखण्यासाठी पालिकेने घेतलेल्या पुढाकाराची माहिती दिली. उद्घाटन सत्राला बीके बिर्ला महाविद्यालयाचे संचालक आणि बीकेबीसी आणि एमकेईएस-एनकेसीचे प्राचार्य उपस्थित होते आणि जागतिक आरोग्यासाठी एलएसआयच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

वैज्ञानिक सत्रामध्ये पद्मश्री डॉ. शशांक जोशी आणि डॉ. धीरज कपूर यांनी प्री-डायबेटिसचा प्रादुर्भाव आणि जोखीम घटकांवर उपस्थितांचे प्रबोधन केले. डॉ. टेत्याना रॉक्स, APD डेकिन युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलियातील वरिष्ठ संशोधन, यांनी मानसिक आरोग्य, आतड्यांतील मायक्रोबायोटा आणि प्रीडायबेटिस यांच्यातील संबंधांवर एक उत्कृष्ट माहिती दिली.

फ्युचर व्हर्सिटी एज्युकेशन ग्रुप आणि लाइफनेस सायन्स इन्स्टिट्यूटचे संचालक गोपाल शर्मा यांनी  माध्यमांशी चर्चा करताना सांगितले की, मधुमेहपूर्व स्थितीच्या प्रत्येक अंगाचा विचार करणे आणि या टप्प्यातील रुग्णांचा टाइप 2 मधुमेहाकडे होणारा प्रवास टाळण्यासाठी उपायांची योजना करणे ही या परिषदेची कल्पना व प्राथमिक उद्दिष्ट आहे. विश्व स्वास्थ्यम-2024परिषदेचे वेगळेपण म्हणजे यात 25हून अधिक प्रख्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची, महत्त्वपूर्ण व गंभीर विषयांवर भाषणे व चर्चासत्रे झाली. एण्डोक्रायनोलॉजिस्ट, मधुमेहतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, पोषणतज्ज्ञ, जीवनशैली प्रशिक्षक व योग तज्ज्ञांचा समावेश होता. प्री-डायबेटिस ओळखणे आणि त्यावर उपाय करणे हे केवळ मधुमेहाची सुरुवात रोखण्यासाठीच नव्हे तर दीर्घकालीन हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गुंतागुंत होण्याचा महत्त्वपूर्ण धोका कमी करण्यासाठीदेखील आवश्यक आहे.

“पूर्व-मधुमेह ते मधुमेह” या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. सुवर्णा पाटील यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील अभ्यासातून आलेले निष्कर्ष सांगितले. प्रख्यात आहारतज्ञ शीतल जोशी आणि प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. नीता देशपांडे यांनी मधुमेहपूर्व स्थिती आणि आहाराबाबत माहिती दिली.

Continue reading

वसुबारस आणि भाऊबीज नाहीत दीपावलीचे भाग!

दीपावली हा प्रकाशाचा उत्सव! अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला...

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...
Skip to content