प्राण्यांना बुद्धिमत्ता असते का? ते विचार करू शकतात का? त्यांना मन असतं का? भावना असतात का? स्वतःच्या अस्तित्त्वाची जाणीव असते का? आत्मभान असतं का? काही वेळा प्राण्यांची हुशारी बघून आपल्यावर आश्चर्यानं तोंडांत बोट घालायची पाळी येते. कधीकधी तर ते अशा काही करामती करतात, की आपण चक्रावूनच जावं. हे सगळं ते उपजत प्रेरणेनं करतात की विचारपूर्वक? माणसाच्या तुलनेत प्राण्यांची बुद्धिमत्ता कुठल्या पातळीवर असते? मुळात बुद्धिमत्ता म्हणजे तरी काय?

मुंगीपासून ते हत्तीपर्यंत आणि चिलटापासून ते चिंपँझीपर्यंत अनेक प्राण्यांवर गेल्या पाच-सहा वर्षांत ‘वर्तनशास्त्र’ या विषयासंदर्भात प्रचंड संशोधन झालं आहे. त्याआधारे या प्रश्नांचा धांडोळा घेणारं हे पुस्तक आहे ‘आपले बुद्धिमान सोयरे’! शास्त्रशुद्ध पद्धतीनं, काटेकोर शब्दांत पण ललित अंगानं लिहिलेलं. खुसखुशीत भाषेत, भरपूर उदाहरणांच्या साहाय्यानं विषय सोपा करून सांगणारं. प्राण्यांबद्दल कुतूहल असणाऱ्या प्रत्येकानं वाचायलाच हवं, असं आगळंवेगळं पुस्तक.
आपले बुद्धिमान सोयरे
लेखक: सुबोध जावडेकर
मूल्य- २६० ₹. / पृष्ठे- २२८
सवलतमूल्य- २३० ₹.
टपालखर्च- ५० ₹.
एकूण- २८० ₹. घरपोच

पुस्तक खरेदीसाठी संपर्क- ग्रंथ संवाद वितरण (8383888148, 9404000347)