सध्याच्या कोरोना काळात लोकांना “वर्क फ्रॉम होम” करावं लागत आहे. दिवसभर आपण एका जागी बसून काम करतो. त्याचा ताण आपल्या शरीरावर पडतो. जर आपण काम करतानाच योगा करू शकलो तर..? ‘गामा फाऊंडेशन’तर्फे अशा प्रकारचा एक अनोखा उपक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.
ॲडव्हायझर्स इन मेडिको मार्केटिंग व मॅनेजमेंटचे सीईओ आणि झुवियस लाईफसायन्सेस, मुंबईचे टेक्निकल अफेअर्स डायरेक्टर, डॉ. उल्हास गानू यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जूनअखेरीस ‘योग सप्ताह’ आयोजित केला होता. “वर्क फ्रॉम होम” करताना योगा कसा करावा, याचे रेकॉर्डेड व्हिडिओ योग सप्ताहमध्ये दाखवण्यात आले. त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

२६ जूनला शेवटचा प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर, खास लोकाग्राहत्सव अजून एक व्हिडिओ काल प्रसारित करण्यात आला. हा विषयच मुळात वेगळा आहे. त्याकरिता ‘गामा फाऊंडेशन’ने एक छोटासा प्रयत्न केला. लोकांनी काम करताना आपले आरोग्य जपण्यासाठी योगसाधनेकडे वळावं हा यामागचा हेतू होता.