Homeचिट चॅट'किनारी मार्गाची भ्रमणगाथा’...

‘किनारी मार्गाची भ्रमणगाथा’ २८ मेपर्यंत खुली!

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई किनारी रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पावर आधारित ‘किनारी मार्गाची भ्रमणगाथा’ हे छायाचित्र प्रदर्शन मुंबईच्या नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए)च्या सहकार्याने, नरिमन पॉइंट येथील ‘एनसीपीए’मधील दिलीप पिरामल आर्ट्स गॅलरीमध्ये २ मे २०२३पासून भरवण्यात आले आहे. प्रदर्शनाला मुंबईकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने या प्रदर्शनाला रविवार, दि. २८ मे २०२३पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावर आधारित ‘किनारी मार्गाची भ्रमणगाथा’ हे छायाचित्र प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, ‘एनसीपीए’चे चेअरमन के. एन. संतूक यांच्या मार्गदर्शनाखाली हे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. आतापर्यंत हजारो मुंबईकरांनी प्रदर्शनाला भेट देऊन प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली. या प्रकल्पाविषयी मुंबईकरांना आधीच खूप उत्सुकता असल्याने प्रदर्शनाला दररोज मोठी गर्दी होत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

विशेष म्हणजे छायाचित्र प्रदर्शनात या प्रकल्पाविषयी माहिती देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अभियंता उपस्थित असल्याने मुंबईकरांना या प्रकल्पाबाबत संपूर्ण माहिती मिळत आहे. किनारी मार्गाची संकल्पना, सद्यस्थितीतील प्रगती दर्शवणारी चित्रफितही दाखविण्यात येत असल्याने भविष्यात आपली मुंबई कशी असेल, याचे सचित्र दर्शन मुंबईकरांना या प्रदर्शनातून होत आहे. हे छायाचित्र प्रदर्शन येत्या २८ मेपर्यंत खुले ठेवण्यात आले आहे. नागरिकांना दररोज दुपारी १२ ते रात्री ८ यावेळेत हे प्रदर्शन पाहता येईल.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content