Homeकल्चर +वाळूशिल्पकार पटनायक यांच्या...

वाळूशिल्पकार पटनायक यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन १८ नोव्हेंबरपासून

मुंबईकरांना प्रथमच जागतिक कीर्तीचे वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन बघण्याची संधी मिळणार आहे. प्रभादेवीतल्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तळमजला व पहिल्या मजल्यावरच्या प्रदर्शन दालनांमध्ये हे प्रदर्शन येत्या १८ नोव्हेंबरपासून २३ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते ७ या वेळेत रसिकांसाठी खुले असेल. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी तसेच राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने प्रथमच पटनाईक यांना प्रदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

ओडिशा येथील समुद्रकिनाऱ्यांवर वाळूच्या माध्यमातून कलाकृती साकार करणारे सुदर्शन पटनाईक त्यांच्या अनोख्या वाळूशिल्पांमुळे जगविख्यात झाले आहेत. समुद्रकिनारी वाळूपासून ते अतिशय कलात्मक शिल्प तयार करत असून त्यांची अनेक वाळूशिल्पे सामाजिक मुद्यांवर भाष्य करणारी, जनजागृती करणारी असतात. पटनायक यांनी आजपर्यंत ६५हून जास्त आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. पद्मश्री (२०१४), गोल्डन सॅण्ड मास्टर अवॉर्ड (२०२४) आणि युनायटेड किंग्डममधले फ्रेड डॅरिंग्टन सॅण्ड मास्टर अवॉर्ड (२०२५) यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी ते सन्मानित झाले असून त्यांची कलायात्रा गौरवली गेली आहे. गोल्डन सॅण्ड आर्ट इन्स्टिट्यूट, या संस्थेद्वारे ते नव्या पिढीतले कलाकार घडवत आहेत. अलीकडच्या काळात त्यांनी मिश्र-माध्यमातील कलाकृतींत उल्लेखनीय प्रयोग केले आहेत व अजूनही करत आहेत.  

Continue reading

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....

येत्या रविवारी आस्वाद घ्या ‘त्रिधा’चा

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या निमित्ताने एक विशेष संगीत कार्यक्रम ‘त्रिधा’ सादर होणार आहे. येत्या रविवारी, १८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे यांची...
Skip to content