Wednesday, January 15, 2025
Homeमुंबई स्पेशलयंदा पावसाचा आनंद...

यंदा पावसाचा आनंद लुटा मुंबईच्या क्विन्स नेकलेसवर!

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण असणारा मरीन ड्राईव्हच्या राणीचा रत्नहार (क्विन्स नेकलेस) परिसराचा पदपथ पुन्हा एकदा पर्यटकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या (कोस्टल रोड) कामासाठी बंद ठेवण्यात आलेला सुमारे १.०७ किलोमीटर लांबीचा पदपथ वापरासाठी पूर्ववत करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांसाठी या पदपथाचा पर्यटनासाठी पुरेपूर वापर करता येईल.

क्विन्स नेकलेस

जी. डी. सोमाणी चौक ते सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह या दक्षिण ते उत्तर दिशेच्या टप्प्यातील पदपथ आता वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोस्टल रोडअंतर्गत दुसरा बोगदा १० जून २०२४ रोजी खुला करण्यात आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात येणार्‍या पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा देण्यासाठीचे निर्देश बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. या भागात पर्यटकांसाठी प्रसाधनगृह आणि पदपथ स्वच्छतेसाठी नियमितपणे देखरेख ठेवण्यासाठी सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

क्विन्स नेकलेस

मरीन ड्राईव्हच्या परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण या प्रकल्पाच्या निमित्ताने करण्यात आले आहे. त्यामुळे १०.५६ मीटर रूंदीचा आणि सरासरी १ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते मफतलाल क्लब सिग्नलदरम्यान वापरासाठी उपलब्ध झाला आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते उत्तर वाहिनीच्या दिशेला रॅम्पला जोडणारा ४०० मीटरचा रस्ता तयार करण्यात आला आहे. यापूर्वी असलेल्या फूटपाथचा वापर करून त्यावर हा रस्ता तयार करण्यात आला आहे. तसेच त्यापुढील मफतलाल सिग्नलपर्यंतचा रस्ता असा सरासरी १ किमी लांबीचा नवा रस्ता वापरासाठी उपलब्ध झाला आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलाच्या शेजारच्या या अतिरिक्त सेवा रस्त्याचा उत्तर बोगद्याच्या प्रवेशासाठी वापरता येईल.

क्विन्स नेकलेस

अतिरिक्त सेवा रस्त्यासोबतच पर्यटकांना पदपथही वापरासाठी पुन्हा एकदा उपलब्ध झाला आहे. या पदपथाच्या शेजारच्या समुद्राच्या भिंतीची उभारणी बीम आणि कॉलमचा वापर करून करण्यात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त भराव न घालताच आतल्या बाजूला हा नवीन पदपथ तयार करण्यात आला आहे. या पदपथाला धडकणाऱ्या समुद्राच्या लाटांचा आघात रोखण्यासाठी टेट्रापॉडचा वापर करण्यात आला आहे.

सुसज्ज आसनव्यवस्था

पूर्वीसारखीच पर्यटकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चालण्यासाठी अधिक दर्जेदार पदपथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिवाय पदपथांना लागूनच चांगली प्रकाशव्यवस्था तयार करण्यासाठी पथदिवे उभारणी नियोजनाचे काम प्रगतिपथावर आहे.

लाटांचा वेग रोखण्यासाठी टेट्रापॉडचा वापर

मरीन ड्राईव्हच्या सी फेस परिसरात धडकणार्‍या लाटांचा वेग आणि आघात रोखण्यासाठी टेट्रापॉडचा वापर किनारपट्टीवर करण्यात आला आहे. संपूर्ण किनारपट्टीवर टेट्रापॉडचा वापर केल्यामुळे लाटांमुळे किनारपट्टीवर होणारा आघात तसेच लाटांचा वेग कमी करण्यासाठी मदत होईल. मरीन ड्राईव्ह किनारपट्टीवर ५९० मीटर भागात टेट्रापॉडचे काम दक्षिण ते उत्तर अशा दिशेत प्रगतिपथावर आहे. 

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content