मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या शनिवारी, २ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता “नॅास्टाल्जिया” हा नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे यांनी दिग्दर्शित केलेला नृत्याविष्कार शरयू नृत्यकलामंदिरचे कलाकार सादर करणार आहेत.
हिंदी आणि मराठी सिने संगीतावर आधारित असलेली ही नृत्य प्रस्तुती सोनिया परचुरे यांच्या नृत्यदिग्दर्शनामुळे प्रेक्षकांमध्ये खूपच प्रसिद्ध असून ती उत्तम आणि दर्जेदार संगीताची आणि नृत्यदिग्दर्शनाची सुंदर सफर घडणार आहे.
हा कार्यक्रम केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. यात कृष्णधवल काळापासून ते अगदी श्रीदेवीच्या काळापर्यंतची दर्जेदार गाणी तितक्याच दर्जेदार पद्धतीने सादर केलेली पाहायला मिळतील. सर्व रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून याचा त्यांनी आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क- ०२२ – २४३०४१५०.