Homeकल्चर +शनिवारी आनंद लुटा...

शनिवारी आनंद लुटा सोनिया परचुरे यांच्या ‘नॉस्टाल्जिया’चा!

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या शनिवारी, २ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता “नॅास्टाल्जिया” हा नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे यांनी दिग्दर्शित केलेला नृत्याविष्कार शरयू नृत्यकलामंदिरचे कलाकार सादर करणार आहेत.

हिंदी आणि मराठी सिने संगीतावर आधारित असलेली ही नृत्य प्रस्तुती सोनिया परचुरे यांच्या नृत्यदिग्दर्शनामुळे प्रेक्षकांमध्ये खूपच प्रसिद्ध असून ती उत्तम आणि दर्जेदार संगीताची आणि नृत्यदिग्दर्शनाची सुंदर सफर घडणार आहे.

हा कार्यक्रम केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. यात कृष्णधवल काळापासून ते अगदी श्रीदेवीच्या काळापर्यंतची दर्जेदार गाणी तितक्याच दर्जेदार पद्धतीने सादर केलेली पाहायला मिळतील. सर्व रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून याचा त्यांनी आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क- ०२२ – २४३०४१५०. 

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content