Homeकल्चर +शनिवारी आनंद घ्या...

शनिवारी आनंद घ्या वर्षा सोहोनी यांच्या शास्त्रीय संगीताचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे शनिवार, १६ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता वर्षा सोहोनी यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी कै. सुमति गायतोंडे ट्रस्टतर्फे सहकार्य मिळाले आहे.

त्यांची गायकी जयपूर अत्रौली घराण्याची असून त्यांनी सुरूवातीला कै. पं. मधुसूदन पटवर्धन, कै. कमलताई तांबे यांच्याकडे संगीत शिक्षण घेतले. नंतर कै. पं. मधुसूदन कानेटकर यांच्याकडे सलग १५ वर्षे तालीम घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून संगीत विषय घेऊन एमएची पदवीही प्राविण्यासह मिळवली आहे. त्या संगीताचे अध्यापन करतात. अधिकाधिक रसिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क २४३०४१५०.

Continue reading

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...
Skip to content