Homeकल्चर +शनिवारी आनंद घ्या...

शनिवारी आनंद घ्या सौमित्र यांच्या गप्पांचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे शनिवार, दिनांक ४ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता प्रसिद्ध अभिनेता आणि कवी किशोर कदम अर्थात सौमित्र यांच्याशी मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. त्याचे संवादक राजीव श्रीखंडे हे आहेत. स्व. वासुदेव व नलिनी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या कार्यक्रमाला विद्या धामणकर यांनी सहाय्य केले आहे.

किशोर कदम हे अतिशय संवेदनशील अभिनेते म्हणून गाजलेले असून त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमधे तसेच मालिकांमध्ये भूमिका केलेल्या आहेत. त्यांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. ‘आणि तरीही मी’ हा त्यांचा कवितासंग्रह खूप लोकप्रिय झाला आणि त्याला अनेक पुरस्कार मिळाले. ते कविता वाचनाचे कार्यक्रमही करतात. त्यांच्या गीतांचा गारवा हा आल्बम खूप गाजला.

संवादक राजीव श्रीखंडे हे जागतिक साहित्याचे अभ्यासक असून ग्रंथालीच्या ग्लोबल साहित्य सफरमधून जगातल्या अजरामर साहित्यकृतींचा परिचय ते करून देतात. ते श्रीखंडे कन्सल्टंट्स या ख्यातनाम आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक असून दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे खजिनदार म्हणूनही कार्यरत आहेत. कार्यक्रमानंतर प्रश्नोत्तरांसाठी थोडा वेळ देण्यात येईल. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content