Tuesday, January 14, 2025
Homeबॅक पेजआजपासून अजित घोष...

आजपासून अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट!

यजमान स्पोर्टिंग युनियनसह एकूण ८ संघांचा सहभाग लाभलेली ४ थी अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आज, २८ फेब्रुवारीपासून ६ मार्च या कालावधीमध्ये खेळविली जाणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेची मान्यता असणारी स्पर्धा साखळी आणि बाद फेरी या तत्त्वावर घेतली जाईल. या स्पर्धेला कल्याणदास मेहता मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेम इंडिया प्रा. लि. यांचे सहाय्य लाभले आहे. एमसीएचे कार्यकारीणी सदस्य संदीप विचारे आणि दिपेन पारेख यांनीदेखील मदतीचा हात स्पर्धेला देऊ केला. स्पर्धेतील सामने मुंबईच्या माटुंगा जिमखाना आणि न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या मैदानात होतील. 

स्पर्धेतील ८ संघांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक संघाला कमीतकमी ३ सामने खेळण्याची संधी मिळणार असल्याचे स्पर्धेच्या आयोजक, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त, भारताच्या माजी महिला कसोटीपटू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अरुंधती घोष यांनी सांगितले.

गटातील दोन अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेतील साखळी सामने २८, २९ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी होतील. उपांत्य फेरीच्या लढती ५ मार्चला रंगणार आहेत. अंतिम फेरीचा सामना ६ मार्च रोजी खेळवण्यात येईल. प्रत्येक सामन्यामधील सर्वोत्तम खेळाडूला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात येईल. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंना विशेष पुरस्कार देण्यात येतील. भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडू संगीता डबीर, सुनिता कनोजिया यांच्या हस्ते स्पर्धेचा उद्घघाटन समारंभ संपन्न होईल. 

स्पर्धेतील संघांची गटवार विभागणी

“अ” गट- स्पोर्टिंग युनियन, माटुंगा जिमखाना, साईनाथ स्पोर्ट्स, नॅशनल

“ब” गट- युरोपेम, ओरिएंटल सी. सी., एम. आय. जी., डॅशिंग स्पोर्ट्स

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content