Homeहेल्थ इज वेल्थलसीकरणामुळे नव्या कोरोनाची...

लसीकरणामुळे नव्या कोरोनाची चिंता नाही!

कोरोना विषाणूच्या जे एन 1 या सब वेरियंटमुळे घाबरण्याची गरज नाही. परंतु सतर्कता पाळणे गरजेचे आहे. कोरोना लसीकरणाने रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ .भारती पवार यांनी काल नागपूरमध्ये दिली.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था – एम्सची पाहणी केली आणि आढावा बैठकही घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि आभा कार्डच्या उपयुक्तेतेबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीवेळी मार्गदर्शन केलं. रुग्णांची माहिती त्यांचा आरोग्यविषयक इतिहास याचं संगणकीकरण केलं जात असल्याने फाईल्सची लांबलचक प्रक्रिया हद्दपार करता येऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासारख्या आपत्ती काळासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर दिला असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केले.

जनोपयोगी योजनांची माहिती एम्सने करून द्यावी आणि लोकांमध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय फोनद्वारे समुपदेशन  देऊ केले जाऊ शकते त्याचादेखील रुग्णांना लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात आणि देशात मेडिकल कॉलेजची संख्या, गुणवत्तायुक्त शिक्षण आणि आरोग्यसेवा याबाबत केंद्रातर्फे देऊ करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

‘वसुधैव कुटुंबकम’ तत्वावर पुढील वाटचाल करीत उत्तम संशोधन आधारित मानवसेवा करायची आहे आणि आपल्या देशाला आरोग्यसेवेत आघाडीवर न्यायचे आहे असे आवाहनही भारती पवार यांनी केले. एम्स नागपूरचे संचालक डॉ. हनुमंता राव, वैद्यकीय अधीक्षक श्रीगीरिवार यांनी एम्सच्या विविध उपक्रमांची माहिती पवार यांना दिली.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content