Homeएनसर्कलअंमली पदार्थांच्या तस्करीसाठी...

अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी नायजेरियन नागरिकाला अटक

देशात अंमली पदार्थ तस्करीचा छडा लावण्याच्या प्रयत्नांत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी ग्रेटर नोएडा येथून कार्यरत अंमली पदार्थ तस्करी टोळीचा प्रमुख सदस्य असलेल्या नायजेरियन नागरिकाला नुकतीच अटक केली.

अंमली

डीआरआयने यापूर्वी 14.10.2023 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून 2.485 किलो कोकेन जप्त केले होते आणि या टोळीसाठी भारतात अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न करताना एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी अधिक सखोल तपासादरम्यान, तस्करी करणाऱ्या या टोळीच्या प्रमुख सदस्याची माहिती मिळाली, जो ग्रेटर नोएडामधून या टोळीला वित्तपुरवठा करून टीम चालवत होता. दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि पाळत ठेवल्यानंतर अधिकाऱ्यांना आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात यश आले.

त्यानंतर मुंबई आणि नोएडा येथील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या डीआरआयच्या पथकाने सापळा रचून तस्करी करणाऱ्या या टोळीच्या प्रमुख सदस्याला उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे मोठ्या संख्येने सिमकार्ड, मोबाईल फोन आणि विविध देशातून जारी केलेले अनेक पासपोर्ट सापडले. त्यानंतर, त्याला अटक करण्यात आली आणि ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

smuggler

Continue reading

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...
Skip to content