Monday, November 4, 2024
Homeपब्लिक फिगरडॉ. उज्ज्वला जाधव...

डॉ. उज्ज्वला जाधव यांचा भाजपला रामराम; काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई विद्यापीठात बायोलॉजीच्या विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यत्वाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर उज्ज्वला जाधव यांनी मुंबईच्या आझाद मैदान येथील राजीव गांधी काँग्रेस भवन येथे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

खासदार वर्षा गायकवाड यांनी डॉ. जाधव यांना पक्षात प्रवेश देताना त्यांच्या हाती काँग्रेसचा झेंडा दिला आणि पक्षाच्या मजबुतीसाठी डॉ. उज्ज्वला जाधव उत्तम काम करतील असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक भला मोठा पुष्पहार खासदार गायकवाड आणि डॉ. जाधव यांना घालून आनंद व्यक्त केला.

डॉ. उज्ज्वला जाधव २०१४पासून भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या म्हणून कार्यरत होत्या. आज सकाळी त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लल्लुसिंग आर्य, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

डॉ. उज्ज्वला जाधव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा माजी आमदार अशोक जाधव, विविध पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभा निवडणूक प्रचार टिपेला पोहोचला असताना भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा वारंवार करीत होते. यासाठी चारशे पारचा नारा दिला जात होता. मी डॉ. आंबेडकर यांची निष्ठावंत कार्यकर्ती असून भारतीय संविधानाशी एकनिष्ठ असल्याने मला भारतीय जनता पार्टीची भूमिका पटत नव्हती म्हणून मी भारतीय जनता पक्ष सोडण्याच्या निष्कर्षाप्रत आले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार प्रा. वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान आदींची भेट घेऊन चर्चा केली आणि अखेर आज काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला, असे डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले.

Continue reading

आज भाऊबीज (यमद्वितीया)!

आज भाऊबीज. या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखाच्या...

दिवाळीत आग लागल्यास फोन करा १०१ किंवा १९१६ क्रमांकावर!

दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. दिवाळीत फटाके फोडताना लहान मुलांची जास्त काळजी घ्‍यावी. फटाके रात्री १० वाजेपर्यंत फोडावेत. या काळात आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तत्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. 'दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे...
Skip to content