Homeहेल्थ इज वेल्थडॉ. सौम्या स्वामीनाथन...

डॉ. सौम्या स्वामीनाथन क्षयरोग निर्मूलनासाठी प्रधान सल्लागार

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रा. (डॉ.) सौम्या स्वामीनाथन यांची त्यांच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रधान सल्लागार म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे.

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या प्रधान सल्लागार म्हणून डॉ. स्वामीनाथन कार्यक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संपूर्ण धोरणावर तांत्रिक सल्ला देतील. धोरणात्मक दिशानिर्देश आणि उत्तम परिणामांसाठी आवश्यक सुधारणा सुचवतील आणि संशोधन धोरणावर सल्ला देतील. जागतिक स्तरावर सर्वोच्च प्रतिभा असलेले तज्ज्ञगट तयार करण्यातही त्या मदत करतील. याव्यतिरिक्त, कार्यक्रमाच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी त्या केंद्रीय आरोग्य मंत्रालय, राज्य अधिकारी आणि विकास भागीदारांना समर्थन देतील.

प्रा. डॉ. स्वामिनाथन जागतिक आरोग्य संघटनेत प्रमुख वैज्ञानिक होत्या आणि त्यांनी यापूर्वी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) महासंचालक म्हणूनही काम केले आहे.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content