Homeचिट चॅटडॉ. काकोडकर, ज्येष्ठराज...

डॉ. काकोडकर, ज्येष्ठराज जोशी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मुंबईतल्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छबिलदास हायस्कूल, दादर आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या “नवनिर्मिती विचारक्षमता निर्माण करणे” या अभिनव उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. डॉ. काकोडकर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांमधील परीक्षणाची तयारी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले.

“इनोव्हेशन स्किल हा शब्द वापरण्यापेक्षा त्याचा मुळ गाभा समजून घेणे अत्यावश्यक आहे. सायंटिफिक टेम्पर जोपासणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. फक्त विज्ञान शिकून वैज्ञानिक दृष्टिकोन मिळत नाही, विचारांची पद्धत वैज्ञानिक असणे महत्त्वाचे आहे. समाजाची प्रगती केवळ ज्ञानाने नव्हे तर तर्कशुद्ध विचारांनीच होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. पद्मभूषण प्रा. ज्येष्ठराज जोशी यांनी नवकल्पनांची खोली समजून घेण्यावर भर देत, “उत्तर शोधायचे असेल तर विषयाच्या मुळाशी पोहोचणे आवश्यक आहे. इनोव्हेशन म्हणजे कल्पनेला शेवटपर्यंत नेण्याची क्षमता,” असे मत व्यक्त केले.

यावेळी डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी विद्यार्थ्यांनी विकसित करावयाच्या प्रमुख कौशल्यांचा उल्लेख करताना सांगितले की, “कुतूहल, प्रत्यक्ष प्रयोग करण्याचे धाडस, वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पनाशक्ती, निर्णयक्षमता, निर्मितीशीलता, परीक्षणाची वृत्ती आणि ‘अंत्योदय ते सर्वोदय’ ही विनोबा भावे यांनी सुचविलेली एकात्म दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये जागी झाली पाहिजे.” GEI चे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी यांनी संस्थेमार्फत या उपक्रमासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन दिले. उपाध्यक्ष डॉ. सुधीर पानसे यांनी विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीक्षम विचार, सखोल ज्ञान आणि जागरूकतेचे वातावरण निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. “नवीन गोष्ट सुरुवातीला कठीण वाटते, पण सातत्य ठेवल्यास ती परिपूर्ण होते,” असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला संस्थेचे कोषाध्यक्ष रविंद्र तामरस, उपकार्यवह महेश केळकर, संचालक मंडळाचे सदस्य, पदाधिकारी, जनरल एज्युकेशन व दादर परिसरातील विज्ञान शिक्षक तसेच छबिलदास इंग्लिश व मराठी माध्यमातील विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाचे नियोजन कार्यवाह विकास पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना इशी व समृद्धी जगताप यांनी केले, तर आभारप्रदर्शन रुपेश गायकवाड यांनी केले.

Continue reading

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....

17 मार्चला मुंबईत टपाल पेन्शन अदालत

मुंबईच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांनी टपाल विभागातल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटूंब वेतनधारकांसाठी येत्या 17 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता टपाल पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांच्या कार्यालयात ही पेन्शन अदालत घेतली जाईल. महाराष्ट्र आणि...

तत्काळ पासपोर्टसाठी पुण्यात 7 तारखेला विशेष मोहीम

पुण्यातल्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने तत्काळ श्रेणीतल्या अर्जदारांसाठी पुण्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रात येत्या शनिवारी, 7 फेब्रुवारीला विशेष पासपोर्ट मोहिमेचे आयोजन केले आहे. पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट लवकर मिळवून देण्यासाठी आणि तातडीच्या प्रवासाची गरज असलेल्या नागरिकांना पासपोर्ट सेवा पुरवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने हा...
Skip to content