Wednesday, January 15, 2025
Homeबॅक पेजजुन्या अणुऊर्जा प्रकल्पांवर...

जुन्या अणुऊर्जा प्रकल्पांवर भारत आणि फ्रान्समध्ये चर्चा

जुन्या होत चाललेल्या अणुऊर्जा प्रकल्पांचे दीर्घकाळ परिचालन करण्यापासून ते लहान आकाराच्या मॉड्यूलर अणुभट्ट्यांसह नव्या आणि प्रगत तंत्रज्ञानांचे नियमन अशा सर्व विषयांवर चर्चा करण्याकरीता अणुऊर्जा प्राधिकरण मंडळाने (एईआरबी) कालपासून उद्यापर्यंत म्हणजेच 5 ते 7 मार्च, या कालावधीत मंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात फ्रान्सच्या एएसएन अर्थात अणुऊर्जा सुरक्षा प्राधिकरणाच्या शिष्टमंडळासाठी तीन दिवसीय बैठकीचे आयोजन केले आहे.

एएसएनचे प्रमुख बर्नार्ड डोरोस्झसीझुक यांच्या अध्यक्षतेखालील या फ्रेंच शिष्टमंडळामध्ये एएसएनचे दोन आयुक्त आणि चार उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही बैठक म्हणजे एईआरबी आणि एएसएन यांच्यातील द्विपक्षीय बंध अधिक मजबूत करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. दोन नियामक संस्थांमधील संबंध अधिक मजबूत करण्याप्रती तसेच अणुऊर्जा क्षेत्रातील सुरक्षा नियमांच्या बाबतीत सहयोगी संबंध वाढवण्याप्रती असलेल्या आमच्या सामायिक वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे, असे एईआरबीचे अध्यक्ष दिनेश कुमार म्हणाले.

जुन्या होत चाललेल्या अणुऊर्जा प्रकल्पांचे दीर्घकाळ परिचालन करण्यापासून ते लहान आकाराच्या मॉड्यूलर अणुभट्ट्यांसह नव्या आणि प्रगत तंत्रज्ञानांचे नियमन अशा सर्व विषयांतील माहितीचे सामायीकीकरण करण्यासाठी तांत्रिक सहकार्याची क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. या बैठकीत एईआरबीच्या नियामक उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी एईआरबीतर्फे नियामक संशोधनावर आधारित विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय द्विपक्षीय बैठकीच्या कालावधीत एएसएनच्या शिष्टमंडळाच्या तारापूर अणुऊर्जा केंद्र भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. एईआरबीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्यविषयक उपक्रमांचा भाग म्हणून जुलै 1999पासून ही संस्था एएसएनशी जोडली गेली आहे.

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content