Homeकल्चर +दिनकर गांगल करणार...

दिनकर गांगल करणार साहित्यरंग महोत्सवाचे उद्घाटन!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे ६ आणि ७ जानेवारी २०२४ यादिवशी साहित्यरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बालसाहित्य’ असा या महोत्सवाचा विषय असून ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन सायंकाळी पाच वाजता होईल. महोत्सवासाठी अनिकेत श्रीखंडे मेमोरियल ट्रस्टचे याकामी सहकार्य मिळाले आहे.

६ जानेवारी या दिवशी स्वाती महाळक यांचे ‘असे फुलले बालसाहित्य’ या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर ‘किलबिल’ हा बालगीताचा कार्यक्रम केंद्राच्या संगीत वर्गाचे विद्यार्थी सादर करतील. त्याच्या सादरकर्त्या वर्षा सोहोनी असून निवेदन सतीश जोशी करतील. रविवार दिनांक ७ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता ‘बालसाहित्याचा प्रवास’ या शीर्षकांतर्गत कथा, कविता, गीते नाट्यछटा असे बालसाहित्याचे विविध प्रकार सादर करण्यात येतील. त्यानंतर विद्याधर गोखले लिखित ‘फुलवा मधुर बहार’ हे बहारदार बालनाट्य सादर होईल. त्याच्या सादरकर्त्या वर्षा भावे असून कलांगणचे बालकलाकार आपली कला सादर करतील.

अधिकाधिक रसिक, साहित्यिक, कलाकार तसेच मुलांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. 

Continue reading

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...
Skip to content